चिखलातील घसरगुंडीवर खडकाचा उपाय

चिखलातील घसरगुंडीवर खडकाचा उपाय

५ जुलैच्या टुडेमधील पान 5 वरील बातमीची इमेज वापरावी
लोगो ः सकाळ इम्पॅक्ट
----------------------------------
gad88.jpg
95747
गडहिंग्लज ः ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पालिका प्रशासनाने नेहरू चौक परिसरात खडक पसरवून रस्ता वाहतूक योग्य केल्याने समाधान व्यक्त झाले. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------------------------------
चिखलातील घसरगुंडीवर खडकाचा उपाय
गडहिंग्लमधील नेहरू चौक : नागरिकांसह व्यावसायिकांतून समाधान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : ‘नेहरू चौकातील चिखलात घसरगुंडी’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाने जागे होत नेहरू चौक परिसरात खडकाच्या उपायाद्वारे घसरगुंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील नागरिकांसह परिसरातील व्यावसायिकांतूनही समाधान व्यक्त होत आहे.
महिन्यापूर्वी नेहरू चौकातील भूयारी गटर दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाने खोदाई केली होती. काम पूर्ण झाल्यानंतर उन्हाचे दिवस असतानाच नागरिकांनी तातडीने या परिसरात डांबरीकरण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करून पालिकेने आहे तीच माती पसरवली होती. दरम्यान, पावसाला प्रारंभ झाल्यानंतर पाण्याने मातीचे रूपांतर चिखलात आणि त्यामुळे घसरगुंडीची परिस्थिती निर्माण झाली. किरकोळ अपघातही झाले. याच परिसरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांनाही चिखलातून कसरत करत मंदिर गाठावे लागायचे. बाजारपेठेतील दुकानदारांनाही त्याचा त्रास सुरू होता. चिखलामुळे व्यवसायावर परिणाम होत होता. वेळोवेळी मागणी करूनही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले.
दरम्यान, ‘सकाळ’ ने ५ जुलैच्या अंकात नेहरू चौकातील चिखलात घसरगुंडी या आशयाची बातमी प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने आज तातडीने खडक (मुरूम) पसरवून वाहतूक योग्य रस्ता करून दिला. यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांतूनही समाधान व्यक्त झाले. दरम्यान, आता कडक ऊन पडल्यानंतर या भागात पालिकेने डांबरीकरणाचा उपाय करावा, अशी नागरिकांची मागणी कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com