म्हैस दूधवाढीसाठी संस्थांनी प्रयत्नशील राहावे ः डोंगळे

म्हैस दूधवाढीसाठी संस्थांनी प्रयत्नशील राहावे ः डोंगळे

Published on

95816
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील नवीन स्थापन झालेल्या दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा सत्कार केला.
.......
म्हैस दूधवाढीसाठी संस्थांनी
प्रयत्नशील राहावे ः डोंगळे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : ‘शिरोळ तालुक्यातील नवीन नोंदणी झालेल्या आणि गोकुळला दूधपुरवठा करत असलेल्या संस्थांनी म्हैस दूधवाढीसाठी प्रयत्न करावेत,’ असे आवाहन गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केले. नवीन १३ प्राथमिक दूध संस्थांना डोंगळे यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
डोंगळे म्हणाले, ‘गोकुळने प्राथमिक दूध संस्‍था व दूध उत्‍पादक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा कारभार केला आहे. प्राथमिक दूध संस्‍था पदाधिकाऱ्यांनी संस्था व दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा. शिरोळ तालुका म्हैस दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सध्या गाय दूध संकलनाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्राथमिक दूध संस्‍थांनी म्हैस दूध संकलनवाढीसाठी प्रयत्नशील राहावे. तसेच संघाच्या विविध योजना, सेवासुविधांचा दूध उत्पादकांनी लाभ घेतला घ्यावा.’
दरम्यान, नूतन दूध संस्थांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा डोंगळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सागर माने (कवठेसार), प्रदीप उलागडे (अकिवाट), सचिन पाटील (दोनोळी), शक्ती पाटील (उदगाव), सागर हेरवाड (तेरवाड), सुनील आळते (दत्तवाड), राजेश खोत (शिवनाकवाडी), सुरेश सावंत (चिंचवाड) व गोकुळचे दूध संकलन अधिकारी मुकुंद पाटील, विस्तार सुपरवायझर सुहास डोंगळे उपस्थित होते.
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.