दप्तर भेट

दप्तर भेट

Published on

95815
...
शालेय साहित्यासह दप्तरांची
६५० विद्यार्थ्यांना भेट
श्रीपूजक मंडळाचा दप्तर अभियानांतर्गत उपक्रम
कोल्हापूर, ता. ८ : करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने दप्तर अभियानांतर्गत ६५० गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांची भेट देण्यात आली. यंदा प्रथमच करवीर तालुक्याबाहेरील शाळांचा समावेश करण्यात आला.
श्रीपूजक मंडळ आणि समिधा प्रतिष्ठान १० वर्षे भरलेले दप्तर देत आहेत. त्यात इयत्तेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या दहा वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला पुस्‍तिका, रंगीत खडू, फूटपट्टी, सॅक या गोष्टींचा समावेश आहे. या उपक्रमात दानशूर नागरिक योगदान देतात. महापालिकेच्या शाळांबरोबरच राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, सांगरूळ हायस्कूल, कै. सौ. वत्सलाबाई बापूसाहेब पाटील विद्यामंदिर टोप, कुमार विद्यामंदिर पाडळी खुर्द या शाळांमध्ये कार्यक्रम झाले.
श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनीश्वर, समिधा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिनी दिवाण, दीपा ठाणेकर, धनश्री उदगावकर, मिनल इनामदार, उमेश उदगावकर, सारंग मुनीश्वर, मनोज मुनीश्वर, संतोष जोशी, राजू खाडे, अमित कांबळे, ऋतुराज नढाळे, ओंकार गोसावी, शुभंकर गोसावी यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.