रखडलेल्या यशोदा पुलाने वाहतुकीला ‘खो’

रखडलेल्या यशोदा पुलाने वाहतुकीला ‘खो’

Published on

ich85.jpg
95750
इचलकरंजी : यशोदा पुलाच्या ठिकाणी बॉक्ससेल पूल बांधण्यात येत असून येथे पाणी साचले आहे.
------------
यशोदा पुलाचे काम होणार ठप्प
पावसाचे पाणी साचले ः कर्नाटक मार्ग बंद पडण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ८ : पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या मार्गावर यशोदा पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, येथे पावसामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रखडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या पुलाला वळसा घालून तात्पुरता सुरू केलेल्या पर्यायी मार्गावर पुढील काही दिवसांत पुराचे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटककडे जाणारा मार्ग बंद पडण्याची भीती आहे. एकूणच यशोदा पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण न झाल्यामुळे यंदाही पुराच्या त्रासातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता धूसर आहे.
पंचगंगा नदीला येणाऱ्या महापुरामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती दूर व्हावी, यासाठी पाणी वाहते राहण्यासाठी तसेच पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जुना यशोदा पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. पूर्वी या ठिकाणी नळ टाकले होते; पण पुराचे पाणी त्यातून गतीने पुढे जात नव्हते. त्यामुळे पुराचे पाणी साचून ते शहरातील नागरी वस्तीच्या शिरत होते. त्यावर पर्याय म्हणून पुलासाठी वापरलेले नळ काढून तेथे कमानीच्या आकारात (बॉक्स सेल) पूल बांधण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याच्या बांधण्यासाठी ५.७४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम सहा महिने सुरू आहे. मात्र, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही बहुतांशी काम अपूर्णच आहे.
या कामामुळे रस्त्याची खोदाई केली आहे. त्यासाठी लगतच सखल भागातून तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. या पर्यायी मार्गावरून कर्नाटकसह हुपरी-कागलकडे जाणारी वाहतूक सुरू आहे. हा पर्यायी मार्ग सुमारे आठ ते दहा फूट खाली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी सुमारे ५० फुटावर गेल्यानंतर या पर्यायी मार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. गत वर्षी पंचगंगा नदीची पाणीपातळी ६० ते ६२ फुटांवर गेल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. यावर्षीही या त्रासातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
---------------
आर्थिक हानी सहन करावी लागणार
इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने येथे नदी पलीकडे असलेल्या गावामधील अनेक नागरिक कामासाठी दररोज ये-जा करीत असतात. त्यासोबत येथे मोठी बाजार पेठ असल्याने खरेदी, विक्रीसाठी नागरिक, व्यावसायिक येत असतात. त्यामुळे पंचगंगा नदी मार्ग ते शिरदवाड, माणकापूर मार्गावर नेहमी वर्दळ असते. हा मार्ग बंद झाल्यास नागरिकांना आर्थिक हानी सहन करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.