विधीमंडळ

विधीमंडळ

Published on

बालकांना उत्तम
बालवाडीची सोय द्या
उपसभापतींचा ‘बालकल्याण’ला सल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई ,ता. ८ ः गरीब घरातील मुलांची घरे गळकी असतात. स्वच्छता पाळणे त्या वस्तीत पालकांना कठीण असते. त्यामुळे अशा वर्गातील मुले ज्या आंगणवाडी किंवा बालवाडीत शिकायला येतात, तेथील वातावरण उत्तम हवे. मुलांना चांगले जग आपण दाखवायला हवे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज नमूद केले. प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान आंगणवाडी केंद्रांवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यात सहभागी होत सुनील शिंदे, सचिन अहीर, भाई जगताप आदीं सदस्यांनी प्रश्‍न केले. या शाळा चांगल्या ठिकाणी असाव्यात, योग्य सुविधा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ७० ते ७५ टक्के बालवाड्या महापालिका चालवते. तेथे काय करायचे, हा त्यांच्या अधिकारातला प्रश्‍न असतो. कधी एसआरए इमारतीत तर कधी कन्टेनरमध्ये वर्ग होतात. त्यावर गोऱ्हे यांनी किमान या मुलांना घरापेक्षा उत्तम वाटतील, अशा सुविधा द्याव्यात ही अपेक्षा व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.