गडहिंग्लज पाणी योजना कामाचा संभ्रम दूर करावा

गडहिंग्लज पाणी योजना कामाचा संभ्रम दूर करावा

Published on

95896
गडहिंग्लज ः पाणी योजनेच्या कामासंदर्भात मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
....
गडहिंग्लज पाणी योजना
कामाचा संभ्रम दूर करावा

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ ः शहराच्या सुधारित पाणी योजनेचे काम बंद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी योजना होणार की नाही, योजनेचे काम असेच रेंगाळणार का, याविषयी नागरिकांत संभ्रम आहे. तो संभ्रम प्रशासनाने खुलासा करून दूर करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले.
शहर व वाढीव हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ४६ कोटींची सुधारित पाणी योजना मंजूर झाली. परंतु सुरुवातीपासूनच योजनेच्या कामात वेगवेगळ्या कारणांनी खोडा घातला जात होता. अखेर पाठपुरावा केल्यानंतर एक जूनपासून योजनेचे काम सुरू झाले. पालिका प्रशासन व ठेकेदाराने संयुक्तरीत्या काम गतीने करून दिवाळीपर्यंत पाणी देण्याची ग्वाही दिली. परंतु काम सुरू होऊन पंधरवडा उलटत नाही तोपर्यंत ठेकेदाराने काम बंद केल्याची चर्चा आहे. मशिनरीही परत गेल्याचे बोलले जात आहे. यामुळे पालिका प्रशासनाने योजनेची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवून काम तत्काळ सुरू करावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी, गीता पाटील, शामल कळसान्नावर, सोनाली पाथरवट, वर्षा जाधव, विजय हसूरकर, किशोर चौगुले, आशा पाटील, बसवंत रेगडे, स्वाती पाटील, सपना सुतार, वंदना गवळी, सुमन बुगडे, लक्ष्मण पाच्छापुरे आदींनी निवेदन दिले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.