शरद इन्स्टिट्यूटच्या १० विद्यार्थ्यांची निवड

शरद इन्स्टिट्यूटच्या १० विद्यार्थ्यांची निवड

Published on

शरद इन्स्टिट्यूटच्या
१० विद्यार्थ्यांची निवड

दानोळी, ता. ९ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल विभागातील १० विद्यार्थ्यांची पोलाद स्टील प्रा. लि. या कंपनीत निवड झाली आहे.
महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुबेर मुरगुंडे, संकेत कांबळे, अशिष मगदूम, हर्षवर्धन संकपाळ, रोहन महाजन, संदीप घबक, तर इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागातील आशितोष कांबळे, प्रसाद पाटील, रोहन पाटील, प्रज्वल शिंदे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
पोलाद स्टील ही टीएमटी स्टील बार, डोवेल बार, टीएमटी कॉइल फॉर्ममध्ये कट आणि बेंड बार, वायर रॉड आदींची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटरशिप असते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना कॅम्पससाठी झाला. तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षांपासूनच प्रोजेक्ट दिला जातो. याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.