कापडी पिशवी मशिनचे महाव्दार रोडवर उदघाटन

कापडी पिशवी मशिनचे महाव्दार रोडवर उदघाटन

Published on

96066
...
मशीनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पिशवी

महाद्वार रोडवर कापडी पिशवी वेंडिग मशीनचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः कोल्हापूर अर्थ वॉरियर्स आणि मे. गोखले ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाद्वार रोड येथे शहरात प्रथमच कापडी पिशवी प्रदान करणाऱ्या मशीनचे उद्‌घाटन करण्यात आले. ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते मशीनचे उद्‌घाटन झाले. या मशीनमध्ये दहा रुपयांचे नाणे टाकल्यानंतर एक कापडी पिशवी मिळते. सोबतच या मशीनला क्युआर कोडचीही सुविधा आहे. यामुळे महाव्दार रोडवर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडे कापडी पिशवी नसेल तर या मशीनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पिशवी मिळणार आहे. यावेळी महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनचे जयंती गोयानी, माजी नगरसेवक किरण नकाते व गोखले ब्रदर्सचे अशोक गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे ‘मी गाडगेबाबा’ या मोहिमेअंतर्गत प्लास्टिकमुक्त कोल्हापूरसाठी विविध उपक्रम राबविले जातात. बाजारात खरेदीसाठी आल्यानंतर अनेकदा कापडी पिशवी नसल्याने नाईलाजाने अनेकांना प्लास्टिक पिशवीचा वापर करावा लागतो. या माध्यमातून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकमुळे प्लास्टिक कचऱ्याची समस्या भीषण बनत चालली आहे. हे टाळण्यासाठी कोल्हापूर अर्थ वॉरियर्सने कापडी पिशवी देणारे मशीन महाद्वार रोडवर बसविण्याचे निश्चित केले. त्यासाठी मे. गोखले ब्रदर्स या भांडी दुकान असलेल्या अशोक गोखले यांनी त्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. या मशीनमध्ये एकावेळी नव्वद कापडी पिशव्या बसू शकतात. दहा रुपये देऊन येथून कापडी पिशवी घेता येणार आहे.
अभिजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी महाद्वार रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, सचिव गुरुदत्त म्हाडगुत, राजेश राठोड, अमोल बुड्ढे, कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे सदस्य आशिष कोंगळेकर, स्नेहल कारेकर, तृप्ती देशपांडे, संगीता कोकितकर, सुहास बट्टेवार, प्रिया मोहिते, अपर्णा खिरे, भरमा दिवटे, पारितोष उरकुडे, विलास पंधारे, जयश्री कजारिया, वैभव कुलकर्णी, राहुल चौधरी, महेश कांजर, दीपक इंग्रोळे, संजय निगवेकर व नारायण लळीत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.