नांगनूर प्रशालेत गुणवंतांचा गौरव

नांगनूर प्रशालेत गुणवंतांचा गौरव

Published on

नांगनूर प्रशालेत
गुणवंतांचा गौरव

नूल, ता. ९ ः ‘चांगला अभ्यास करून प्रगती करा. प्रकट वाचनाकडे लक्ष द्या. संभाषण कौशल्य आत्मसात करा. आदर्श व्यक्तिमत्त्वाचे अनुकरण करा, स्वावलंबी व्हा आणि देशाचा आदर्श नागरिक बना,’ असे आवाहन माजी मुख्याध्यापक ए. बी. कल्याणी यांनी केले. नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील श्रीराम हायस्कूलमध्ये दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्याध्यापक सचिन वाडकर यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यालयात गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या श्रद्धा लोहार, आर्या मोकाशी, रसिका घोरपडे, अलिशा नाईकवाडे यांना कल्याणी, एस. बी. पाटील, वाडकर यांच्याहस्ते बक्षीस वितरण झाले. माजी विद्यार्थी रमेश नार्वेकर यांची आरोग्य सेवकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार झाला.
श्रद्धा लोहार, दत्तात्रय वाघमोडे, तानाजी आमगे यांनी मनोगत व्यक्त केले. एस. बी. पाटील, एल. एस. कोडोली, माजी प्राचार्य एम. ए. शिंदे, राजाराम कासारकर आदींसह शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. पी. ए. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील नाईक यांनी आभार मानले.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.