नांगनूर प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

नांगनूर प्रशालेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

Published on

माजी विद्यार्थ्यांचा
नांगनूर शाळेत स्नेहमेळावा
नूल ः नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील श्री राम हायस्कूलच्या १९९४ च्या बॅचचा स्नेहमेळावा विविध सामाजिक उपक्रमानी उत्साहात पार पडला. एकमेकांना भेटताच सगळ्यांच्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रा. सचिन शिंदे, दिपक मोकाशी, विनोद बणगे, काशिनाथ पोरीवाडे, नारायण नार्वेकर, अनिता मोकाशी यांच्या पुढाकाराने स्नेहमेळाव्याचे नियोजन केले होते. सचिन शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेले शिक्षकांचे फोटो असलेले आणि कृतज्ञतेने शब्दबद्ध केलेले वुडन स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देवून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला. माजी मुख्याध्यापक के. बी. सुगते, एस. बी पाटील, ए. बी. कल्याणी, एल. एस. कोडोली, हुमायून मुरसल, कालेकाजी, कुडाळकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ सचिन शिंदे, अनिता मोकाशी, अलका शिंदे यांनी शाळा व शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. काशिनाथ पोरीवाडे यांनी सुत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.