बीग स्टोरी -३ कोटीचे ऑटोमेटिक टेस्टिंग सेंटर

बीग स्टोरी -३ कोटीचे ऑटोमेटिक टेस्टिंग सेंटर

बिग स्टोरी
----------
लुमाकांत नलवडे
...
96035
...
वाहनांचा ‘फिटनेस’ मशीन तपासणार

देशातील दुसरा ट्रॅक कोल्हापुरातः तीन कोटींचे बजेट, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुहूर्त शक्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : मानवी हस्तक्षेप बंद करून ‘ऑटोमेटीक टेस्ट फिटसेन ट्रॅक’ कोल्हापुरात साकारात आहे. यासाठी तीन कोटींचे बजेट असून साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खडीचा गणपती मंदिर ते कंदलगाव रस्त्याकडील बाजूला प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) ‘फिटनेस ट्रॅक’च्या जागेत हा अद्ययावत ट्रॅक होणार आहे. यामुळे वाहनांची फिटनेस तपासणी थेट तांत्रिक पद्धतीने होईल.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटांकडूनच अधिक कामे होतात. तेथील चिरीमिरी बंद करण्यासाठी मानवी हस्तक्षेप बंद करणे आवश्‍यक असल्याचे केंद्रीय परिवहन विभागाने निश्‍चित केले. यामुळे येथील वाहनांच्या सर्व तपासण्या केवळ मशीन करेल. यासाठी आवश्‍यक सर्व मशिनरी फिटनेस सेंटरमध्ये उभारल्या जातील. येथे कोणाचीही मोटार उभी केली तर तांत्रिक पद्धतीने सर्व तपासण्या होतील. त्यामध्ये यशस्वी झाल्यास फिटनेस सर्टिफिकेट दिले जाणार आहे. सध्या अनेक वेळा मानवी हस्तक्षेपामुळे वाहनाचा फिटनेस चांगला नसला तरीही त्याला संमती दिली जाते. येथे मोटार वाहन निरीक्षक आणि मालक किंवा एजंटांकडून हस्तक्षेप होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावरून जाण्यासाठी वाहन योग्य नसले तरीही त्याचे पासिंग होऊ शकते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता येणारी ऑटोमेटीक टेस्ट फिटनेस ट्रॅकमुळे फिटनेस तपासणी काटेकोर होईल, अशी अपेक्षा आहे.
...
पासिंगसाठी होतात २६ चाचण्या
एखाद्या वाहनाचे पासिंग करायचे असल्यास साधारण २६ चाचण्या घेतल्या जातात. त्यामध्ये प्राथमिक कागदपत्रांची तपासणी वगळता बहुतांशी चाचण्या या मैदानावर घेतल्या जातात. सध्या कागदपत्रांची नोंदणी ऑनलाईन करावी लागते. त्यानंतर आगाऊ वेळ घेऊन (अपॉईमेंट) प्रत्यक्षात वाहनाची टेस्ट ट्रॅकवर घ्यावी लागते. सध्याही हीच पद्धत सुरू आहे. मात्र येथे सर्वच प्रक्रिया मॅन्युअली होते. तीच प्रक्रिया आता ऑटोमेटीक होणार आहे.
...
कंदलगाव मार्गावरील फिटनेस ट्रॅकची जागा निश्‍चित
पासिंगसाठी देशातील पहिला ऑटोमेटीक ट्रॅक नाशिकमध्ये तयार झाला आहे. त्यानंतर देशातील दुसरा ट्रॅक कोल्हापुरात साकारणार आहे. यासाठी सध्या होत असलेल्या कंदलगाव मार्गावरील फिटनेस ट्रॅकचीच जागा निश्‍चित केली आहे. यासाठी निविदा प्रक्रियाही झालेली आहे. संबंधित ठेकेदार अन्य जिल्ह्यातील आहे. अनेकवेळा बैठका घेऊन साधारण ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
...
असा असेल ऑटोमेटीक टेस्ट ट्रॅक ...
वाहनांच्या वर्गवारीनुसार ट्रॅक असतील. प्रत्येक वाहनांची लाईट ऑटोमेटिक तपासली जाईल. त्यामुळे वाहनांच्या लाईटचा इतरांना त्रास होणार नाही. ब्रेक, इंडिकेटर, स्टेअरिंग टेस्टही तांत्रिक होईल. तेथे मानवी हस्तक्षेप राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही असेल. मशिनमध्ये मोटार घेऊन गेल्यानंतर सर्व तांत्रिक बाबींना मशिनद्वारे गुण दिले जातील. दुरुस्ती असेल तर त्याच दिवशी दुरुस्ती करून पुन्हा टेस्टला वाहन येणार नाही. त्यासाठी पुन्हा दुसऱ्या दिवशीची अपॉईमेंट घ्यावी लागणार आहे. निरीक्षक किंवा एजंटाच्या मध्यस्थीने सुद्धा येथे चुकीचे वाहन पासिंग होणार नाही. जवळपास वीस चाचण्या मशिनद्वारे घेतल्या जातील.
...
‘ राज्यात एकूण १९ ट्रॅक उभारणार आहेत. त्यापैकी कोल्हापूर आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जागा मोजणी, त्याचे नकाशे सुद्धा तयार झाले आहेत. प्रत्यक्षात काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप ते झालेले नाही. संबंधित ठेकेदाराला याबाबत दोन-तीन वेळा बैठका घेऊन सूचना दिल्‍या आहेत.
विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com