दहन, दफन निधीची लाभार्थींना प्रतीक्षा

दहन, दफन निधीची लाभार्थींना प्रतीक्षा

Published on

दहन, दफन निधीची लाभार्थींना प्रतीक्षा
इचलकरंजी महापालिकेकडे २०२३-२४ मध्ये ९७ अर्ज
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२३ : इचलकरंजी पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर आयुक्तांनी आर्थिक बोजा वाढल्याचे कारण देत अनेक योजनांमध्ये बदल केले. मोफत दहन व दफन योजनेचा निधी २७ एप्रिल २०२३ पासून केवळ दारिद्ररेषेखालील नागरिकांसाठी सुरू ठेवला. त्यामधून २०२३-२४ आर्थिक वर्षात सुमारे ९७ अर्ज दाखल झाले आहेत. काही लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.
शहरात महिन्यामध्ये सरासरी १२५ दहन-दफन याची नोंद होते. एका अंत्यविधीसाठी सुमारे २ हजार ५०० रुपये खर्च येतो. त्यामुळे महापालिकेने डिसेंबर २०२१ मध्ये एक हजार रुपयांचा निधी वाढवून तीन हजार केला. परिणामी दहन-दफन वार्षिक निधी १५ लाखांवरून सुमारे ४५ लाख रुपये करावा लागला. याचा आर्थिक बोजा वाढल्याने हा निधी केवळ दारिद्र्यरेषेखाली आणण्यासाठी केला. सध्या शहरात दारिद्र्यरेषेखाली कुटुंब संख्या १० हजार ७६१ आहे. २०२३-२४ दरम्यान २३१ अर्ज दाखल असून, त्यामधील ९७ अर्ज दारिद्र्यरेषेखाली आहेत. १ लाख ८ हजार रुपये निधी वाटप केला आहे. महापालिकेने अनावश्यक खर्चास आळा घालून हा निधी पुन्हा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
---------------
कोणत्या खर्चाचा बोजा
दहन दफन निधीचा बोजा वाढल्याचे कारण देत या योजनेमध्ये बदल केले, मात्र महापालिका आयुक्तांच्या सुरक्षारक्षकांवर वर्षाकाठी सुमारे ४० लाख खर्च होतो. त्यासोबत आयुक्तांच्या नव्या निवासस्थानासाठी व्यवसायास अनकुल असलेल्या जागेत सुमारे २ कोटी खर्च करण्यात येत आहे. यासोबत अन्य ठिकाणी ही लाखो रुपयांची उधळण होत असते. त्यामुळे महापालिका कोणत्या खर्चाचा बोजा सहन करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
--------------------
इचलकरंजी हे कामगारांचे शहर आहे. मृत्यूसारख्या समयी अंत्यविधीसाठी सामान्य नागरिकांची परवड होऊ नये यासाठी निधी वाढवण्याचा निर्णय घेतला. सध्या बंद केलेला निधी सर्वांसाठी सुरू करण्यास वेळप्रसंगी आंदोलनाचा मार्गही अवलंबणार आहे.
-सॅम आठवले, अध्यक्ष, युवा महाराष्ट्र सेना
-------------------
लोकसंख्या दृष्टिक्षेप
शहराची लोकसंख्या - सुमारे ३ लाख ८० हजार
दारिद्र्यरेषेखाली कुटुंब संख्या -१० हजार ७६१
दारिद्र्यरेषेखाली नागरिकांची संख्या- ५२ हजार ४०१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.