कर्नाटकच्या महाराष्ट्रातील सर्व शाळांना मोफत वीज द्या

कर्नाटकच्या महाराष्ट्रातील सर्व शाळांना मोफत वीज द्या

Published on

कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील
सर्व शाळांना मोफत वीज द्यावी

खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय व खासगी अनुदानित शाळांना मोफत वीज द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. त्याबाबतचे निवेदन या महासंघाच्या शिष्टमंडळाने सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड यांना दिले.
राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित शाळा व सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाच्या पद्धतीबरोबर संगणक व प्रोजेक्टरद्वारे ऑनलाईन शिक्षण तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीने शिक्षण दिले जाते. यासाठी तसेच दैनंदिन शालेय कामकाजासाठी विजेची आवश्यकता असते. राज्यातील सर्व शाळांना दरमहा वीज बिल भरावे लागते. पूर्वी हे वीज बिल घरगुती दराने आकारले जात होते. पण, सध्या हे वीज बिल व्यावसायिक दराने आकारले जाते. बऱ्याच वेळेला वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो. कर्नाटक शासनाने सर्व शासकीय शाळांना मोफत वीज देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्याबाबत सर्व शाळांनी माहिती भरण्यास शाळांना कळविले आहे. कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांना मोफत वीज देण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात राज्य सचिव राजेंद्र कोरे, राजाराम संकपाळ, दस्तगीर मुजावर, धीरज पारधी, राज मेंगे, सागर जाधव, अभिजित साळोखे यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.