पासिंग दंड

पासिंग दंड

Published on

गाड्यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे.

पासिंगसाठीच्या दंडातून २३० कोटी वसूल
‘आरटोओ’ची २० हजार २३४ वाहनांवर कारवाई; वाहनधारकांना भुर्दंड

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहनांच्या पासिंगसाठीच्या दंडातून २३० कोटी ७९ लाख ९ हजार ४०० रुपये वसूल केले आहेत. आजपर्यंत २० हजार २३४ वाहनांवर कारवाई केली असून, सर्वाधिक दंड २ लाख ७२ हजार ९०० रुपये वसूल केला आहे. एक जूनपासूनही कारवाई करण्यात येत आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड मात्र वाहनधारकांना सोसावा लागत आहे.
वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस) मुदत संपल्यानंतर त्यांचे तत्काळ नूतनीकरण करावे, असा निर्णय झाल्यानंतर त्याला जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सीसह अन्य वाहनधारकांनी विरोधाची भूमिका घेतली. ज्या वाहनांची २०१७ ला मुदत संपली आहे, त्यांना प्रतिदिन पन्नास रुपये दंड लागू केल्याने, वाहनधारकांनी आदेशाची होळी करत संताप व्यक्त केला. तत्पूर्वी, पुण्यातील रिक्षा संघटनांनी २०१७ ला उच्च न्यायालयात पासिंगबाबतच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती आठ वर्षांनंतर उठल्याने कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन विभागाने प्रतिदिन पन्नास रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे काही वाहनांच्या दंडाची रक्कम लाखांत पोहोचली आहे. ती वसूल करण्याचे काम विभागाकडून केले जात आहे.

* वाहन प्रकार* संख्या* दंड
तीन चाकी पॅसेंजर*४ हजार ६४९*४५ कोटी ५३ लाख ५२ हजार ६००
ॲब्यूलन्स*९६*१ कोटी ५ लाख ५७ हजार ६००
आर्टिक्युलेटेड*१७*१३ लाख ५२ हजार ३००
बस*४९७*५ कोटी ६७ लाख ४० हजार ५००
कॅश व्हॅन*१३*१० लाख १८ हजार ४००
डंपर*२९*२७ लाख ६१ हजार ५००
शैक्षणिक बस*१*१ लाख ११ हजार २००
फायर फायटिंग वाहने*१२*१६ लाख ८९ हजार ६००
गुड्स कॅरियर*१३ हजार १८१*१५३ कोटी ५६ लाख २९ हजार ७००
मॅक्सी कॅब*१६*२३ लाख ७८ हजार १००
मोटर कॅब*४६२*६ कोटी ४ लाख ३३ हजार
तीनचाकी गुड्स*१२६१*१७ कोटी ९८ लाख ८४ हजार ९००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.