चलो विशालगड १४ जुलैला

चलो विशालगड १४ जुलैला

Published on

विशाळगड अतिक्रमणाविरोधातील
धडक आता शनिवारऐवजी रविवारी

शिवभक्तांच्या सूचनेनुसार तारखेत बदल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकराने शिवभक्त रविवारी (ता. १४) दुपारी बारा वाजता गडावर धडक देणार आहेत. राज्यातून हजारो शिवभक्त येण्यास उत्सुक असल्याने गडावर १३ जुलैच्या (शनिवार) तारखेत बदल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जौहरच्या पन्हाळ्यावरील वेढ्यातून १२ जुलैला शिताफीने निसटून विशाळगडाच्या दिशेने गेले होते. ते १३ जुलैला विशाळगडावर सुखरूप पोहोचले. त्यांना सुखरूप पोहोचविण्याच्या कार्यात वीर शिवा काशीद, वीर बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना व अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान दिले. या प्रेरणादायी दिवसाचे औचित्य साधून संभाजीराजे यांनी विशाळगडाला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार गडावर १३ ऐवजी १४ जुलैला धडक देण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.