केडीसीसीत लाडकी बहिणसाठी झिरो बॅलेन्स खाते

केडीसीसीत लाडकी बहिणसाठी झिरो बॅलेन्स खाते

Published on

केडीसीसी बँकेत ‘लाडकी बहीण’
योजनेची खाती झीरो बॅलन्सवर

कोल्हापूर, ता. ९ ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेसाठी झीरो बॅलन्सवर खाती उघडून घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी दिली. पालकमंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू केली आहे. झीरो बॅलन्स सुविधा देणारी ही राज्यातील पहिली बँक असल्याचेही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा बँकेने नवीन खाते केवळ शून्य बाकीवर उघडण्याची योजना सुरू केली आहे. बँक शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाचे वाटप करीत आहे. तसेच लेक लाडकी योजनाही बँकेने प्रभावीपणे राबवली आहे. कोणत्याही शाखेत सध्या चालू असलेल्या बचत ठेव खात्यामध्येही सरकारच्या योजनेतील रक्कम जमा करून लाभ घेता येईल. या खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि जीवन सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळेल. माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.