पोलिसवृत्त

पोलिसवृत्त

Published on

कोतोली फाट्यावर
एकास मारहाण

कोल्हापूर ः कोतोली फाट्यावर झालेल्या मारहाणीत महादेव बबन रांजगणे (वय ४०, रा. पडवळवाडी, करवीर) जखमी झाले. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
...........
भरतीदरम्यान दोघे
किरकोळ जखमी

कोल्हापूर ः भारत राखीव बटालियनच्या भरतीवेळी धावण्याच्या चाचणीत तोल जाऊन पडल्याने दोघे किरकोळ जखमी झाले. सुरेश अनिल पोर्लेकर (वय ३०, रा. शिंगणापूर, करवीर) व सुदर्शन रामदास मुंडे (वय ३०, रा. उदगीर, लातूर) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी सकाळी कसबा बावडा ते शिये रस्त्यावर हा प्रकार घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
--------------
दुचाकीच्या धडकेतील
वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर ः इस्पुर्ली (ता. करवीर) येथे भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेतील जखमी आण्णाप्पा बाबू जोग (वय ७२, रा. राशिवडे, राधानगरी) यांचा मृत्यू झाला. ७ जुलैला पायी देवदर्शनाला निघाले असताना अज्ञात दुचाकीने धडक दिली होती. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-----------------
गळफास घेतलेल्या
तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर ः गळफास सोडवून उपचारास दाखल केलेल्या प्रशांत रावसाहेब मस्कर (वय ३२, रा. चंदूर, हातकणंगले) याचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. ६ जुलैला त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी फास सोडवून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर बनल्याने सीपीआरमध्ये आणले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
......................
आर. के. नगरात
तरुणावर चाकूहल्ला

कोल्हापूर ः आर. के. नगर ते पाचगाव रस्त्यावर झालेल्या चाकूहल्ल्यात अरुण संभाजी मोरे (वय ३०, रा. बापूरामनगर, कळंबा) जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.
..............
विषारी द्रव
प्यायलेल्या
वृद्धेचा मृत्यू

कोल्हापूर ः विषारी द्रव प्याल्याने प्रकृती चिंताजनक बनलेल्या नानूबाई केशव सुर्वे (वय ८१, रा. चोफोडी, करवीर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला राहत्या घरी विषारी द्रव प्याल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.