सिध्दार्थ सोसायटीचा उपक्रम आदर्शवत

सिध्दार्थ सोसायटीचा उपक्रम आदर्शवत

ich93.jpg
96048
इचलकरंजी ः सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतर्फे खासदार धैर्यशील माने यांचा मानपत्र देऊन सत्कार केला.

सिद्धार्थ सोसायटीचा उपक्रम आदर्शवत
खासदार धैर्यशील माने ः संगणक प्रशिक्षण, प्रबोधिनीचे उद्‌घाटन
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० ः गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण, तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळण्यासाठी सिद्धार्थ हौसिंग सोसायटीने सुरू केलेला सामाजिक उपक्रम शहरात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
येथील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीतील संगणक प्रशिक्षण केंद्र आणि महात्मा फुले प्रबोधिनी यांचे संयुक्त उद्‌घाटन खासदार माने यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील आंबेडकर चळवळीतर्फे खासदार माने यांना मानपत्र प्रदान करून नागरी सत्कार केला. माजी नगरसेवक मदन कारंडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे भाषण झाले. माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, भाऊसाहेब आवळे, प्रा. अमर कांबळे आदी उपस्थित होते. देवेंद्र कांबळे यांनी मानपत्र वाचन केले. स्वागताध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी स्वागत केले. प्रदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद बेलेकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com