कचरा सफाईवरुन झाडाझडती--

कचरा सफाईवरुन झाडाझडती--

Published on

राजेंद्रनगर परिसरातील अस्वच्छतेवरून
महापालिकेचे अधिकारी धारेवर
कोल्हापूर, ता. ९ ः कचऱ्याचा उठाव नाही, सफाईकाम व्यवस्थित केले जात नाही, अशा तक्रारी राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांनी करत सहायक आयुक्त व मुख्य आरोग्य निरीक्षकांना भागातून फिरवले. यावेळी माजी नगरसेवक रुपाराणी निकम यांनी यंत्रणेच्या नियोजनावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
राजेंद्रनगर, वर्षानगर, साळोखेनगर या परिसरात कचऱ्याचा उठाव करण्यास टिप्पर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना ठिकठिकाणी कचरा टाकावा लागत आहे. तसेच गटारे व भागातील सफाईकाम व्यवस्थित केले जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता पसरून आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत असल्याचे सांगत रुपाराणी निकम, संग्राम निकम व भागातील नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यानंतर सहायक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार व कर्मचाऱ्यांना घेऊन ठिकठिकाणची फिरती करण्यात आली. निकम यांनी अशा अस्वच्छतेत नागरिक राहिल्यास आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत, तर काय होणार, असे सांगत कचरा उठाव व सफाईचे नियोजन लावण्याची सूचना केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.