भूसख्खलन मंत्रालयात प्रश्‍न

भूसख्खलन मंत्रालयात प्रश्‍न

जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका
टाळण्यासाठी काय कार्यवाही केली?

सतेज पाटील यांचा विधान परिषदेत सवाल

कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या ८८ गावांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. याला मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील यांनी मानवी वस्तीजवळ असणाऱ्या १३ भूस्खलन ठिकाणांवर पहिल्या टप्प्यात भूस्खलन सौम्यीकरण कामासाठी ८३ कोटी १५ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने दिला असून, त्यावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात स्पष्ट केले.
आमदार पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे भूस्खलग्रस्त गावातील ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८८ गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावातील नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी तसेच त्यांच्या स्थलांतरणासाठी कोणती कार्यवाही केली, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
यावर दिलेल्या लेखी उत्तरात मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी अहवाल दिला आहे. या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन भूस्खलनाबाबतची माहिती घेतली आहे. यातील १३ ठिकाणे मानवी वस्तीपासून जवळ असल्याचे दिसले आहे. या सर्व ठिकाणी पावसाळ्यापूर्वी भूस्खलनाबाबत जनजागृती केली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला याबाबत पुन्हा एकदा सर्वेक्षण करून तांत्रिक अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीचा इशारा प्राप्त होताच या कुटुंबांना सुरक्षित निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्याचे नियोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com