‘पॅरा ॲथलेटिक’मध्ये अभिषेक जाधवची निवड

‘पॅरा ॲथलेटिक’मध्ये अभिषेक जाधवची निवड

Published on

‘पॅरा ॲथलेटिक’मध्ये
अभिषेक जाधवची निवड
कोल्‍हापूर ः ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनने समर्थ पॅरा-स्‍पोर्टस् प्रोग्रामअंतर्गत तीन वर्षांसाठी देशातील २० पॅरा-अॅथलिटना पाठबळ दिले आहे. त्यामध्ये येथील खेळाडू अभिषेक जाधवचा समावेश आहे. तो शंभर व दोनशे मीटर पॅरा ॲथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहे. या सर्व खेळाडूंना आर्थिक सहाय्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आवश्यक साहित्याबरोबरच सॉफ्ट स्कील्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. खेळाडूंनी जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.