जादा क्षमतेचे टिप्पर

जादा क्षमतेचे टिप्पर

फाईल फोटो
...
महापालिका घेणार जादा क्षमतेचे टिप्पर
उपनगरात ठिकठिकाणी पडणारे कचऱ्याचे ढीग होणार कमी
कोल्हापूर, ता. १० ः कचरा वाहून नेण्याची कमी क्षमता, प्रकल्पापर्यंत जाण्यास होत असलेला वेळ, त्यातून उपनगरातील कचरा उठावावर येत असलेल्या मर्यादा यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे पडणारे ढीग कमी करण्यासाठी आता महापालिका जादा क्षमतेचे टिप्पर घेणार आहे. त्यामुळे उपनगरातील एका प्रभागांतील कचरा किमान दोन फेऱ्यांमध्ये उठाव होण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेकडून घरोघरी फिरून कचरा संकलन सुरू केल्यानंतर टिप्पर घेण्यात आले. त्यातील काही डिझेलचे तर काही सीएनीजीचे आहेत. त्यांच्यावर ओला व सुका कचऱ्याचे दोन भाग असलेले बॉक्स आहेत. त्यातून दोन क्युबिक मीटर कचरा वाहून नेता येतो. मध्यवस्तीतील तसेच प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरातील प्रभागातील टिप्पर दिवसांतून दोन ते तीन फेऱ्या करतात. पण फुलेवाडी, आपटेनगर, रायगड कॉलनी, जरगनगर, राजेंद्रनगर, टेंबलाईवाडी अशा उपनगरातील टिप्परच्या दोन फेऱ्या कशातरी होत आहेत. त्यातून तेथील कचरा उठाव होण्यास विलंब होऊन नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकतात. घरातील कचरा उठाव होत नसल्याच्या तक्रारी उपनगरातील प्रभागातील असल्याने प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत आलेल्या निधीतून सीएनजीचे टिप्पर घेण्याचा प्रस्ताव बनवण्यात आला. त्यासाठी उपनगरातील समस्या लक्षात घेऊन बांधणी करण्याचे ठरवले आहे. साडेतीन क्युबिक मीटर क्षमतेचे टिप्पर घेतल्याने जादा कचरा उठाव करता येणार आहे. तसेच दोन फेऱ्यातूनच त्या प्रभागातील दररोजचा कचरा उठाव होईल, असे नियोजन केले आहे. याबाबतची निविदा जाहीर केली जाणार आहे. लवकरच ती पूर्ण करून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांची बांधणी केली जाऊ शकते. त्यामुळे या वर्षअखेरीपर्यंत नवीन टिप्पर ताफ्यात येऊन उपनगरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न निकाली निघण्याची शक्यता आहे.

...
महापालिकेकडील सध्याचे टिप्पर
१६९
...
जुन्या टिप्परची क्षमता
२ क्युबिक मीटर
...
नवीन घेण्यात येणारे टिप्पर
३०
...
नवीन टिप्परची क्षमता
३.५० क्युबिक मीटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com