महात्मा बसवेश्वर पुतळा

महात्मा बसवेश्वर पुतळा

96215
...
चित्रदुर्ग मठात आता
महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा
मठाधिपती शिवानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १०ः दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात आता महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. कर्नाटक शासननियुक्त चित्रदुर्ग मुख्य मठाचे प्रशासकीय अधिकारी व सेवानिवृत्त आय.ए.एस अधिकारी शिवयोगी कळसद, चित्रदुर्ग मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामीजी व बंगळूरचे जिल्हाधिकारी नितीन पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या वेळी विजापूर मठाचे सिद्धलिंग स्वामीजी उपस्थित होते.
कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे व राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे शहर म्हणून सर्वत्र ओळखले जाते. ११२ वर्षांपूर्वी अथणी येथे राजर्षी शाहू महाराज व श्री जयदेव जगद्‌गुरुंची भेट झाली झाली होती. या वेळी महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराने राजर्षी शाहू महाराज प्रभावित झाले व त्यांनी बसव साहित्य व बसव तत्त्‍वांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी दसरा चौक येथे जागा दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या दसरा चौक येथील असलेल्या पुतळ्याजवळील याच मठात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पुतळा बसविण्याबरोबर महात्मा बसवेश्वर यांच्या तत्त्‍वांच्या व विचारांच्या प्रसारासाठी मठाच्या संवर्धनासाठी लागेल ते सहकार्य करू, असे शिवयोगी कळसद यांनी सांगितले. या वेळी सरलाताई पाटील, अजय डोईजड, सोमराज देशमुख, अनंत मुरगुडे, एस. आर. हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राजशेखर तंबाके, बाबूराव तारळी, एस. एम. महाजन, बापू चौगुले, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, श्रीकांत वडियार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com