‘महाराष्ट्र’, ‘शांतिनिकेतन’मध्ये आज अंतिम लढत

‘महाराष्ट्र’, ‘शांतिनिकेतन’मध्ये आज अंतिम लढत

Published on

96214
कोल्हापूर : सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत महावीर इंग्लिश स्कूल विरुद्ध पोदार स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
.......
‘महाराष्ट्र’, ‘शांतिनिकेतन’मध्ये आज अंतिम लढत

१७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धा ः ‘पोदार’, ‘शाहू’ यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी झुंज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः महापालिका व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या महापालिकास्तरीय १७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालयाचा, तर शांतिनिकेतन स्कूलने पोदार स्कूलचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढत उद्या (गुरुवार) महाराष्ट्र हायस्कूल व शांतिनिकेतन स्कूल यांच्यात होणार आहे.
सामने संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलात सुरू आहेत. स्पर्धेत आज उपांत्यपूर्व लढतीत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाचा चार विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. महाराष्ट्र हायस्कूलकडून प्रतीक पाटीलने दोन, तर सर्वेश गवळी, मयूर सुतारने प्रत्येकी एक गोलची नोंद केली. दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) संघाने विद्यापीठ हायस्कूलचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. छत्रपती शाहू विद्यालयाकडून अर्श आजरेकर, श्रेयस ओतारी यांनी, तर विद्यापीठ हायस्कूलकडून मयूर जाधव याने गोलची नोंद केली.
तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत शांतिनिकेतन स्कूलने वसंतराव देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलचा चार विरुद्ध एक गोलने पराभव केला. शांतिनिकेतनकडून पीयूष सूर्यवंशी, अलोक उबराणी, तनवीर नदाफ, समरजित अपराध यांनी प्रत्येकी एक गोलची, तर देशमुख इंग्लिश मीडियमकडून आयुष पाटीलने एका गोलची नोंद केली.
चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत पोदार स्कूलने महावीर इंग्लिश स्कूलचा तीन विरुद्ध दोन गोलने पराभव केला. तत्पूर्वी संपूर्ण वेळेत हा सामना एक-एक असा बरोबरीत राहिला. पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय (सीबीएसई) संघाचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. महाराष्ट्रकडून कार्तिक निकम, हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. या विजयाने महाराष्ट्र हायस्कूलचा संघ अंतिम फेरीत पोहोचला.
दुसऱ्या उपांत्य लढतीत शांतिनिकेतन स्कूलने पोदार स्कूलचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. शांतिनिकेतनकडून अलोक उबराणी, सोहम नरसिंघानी यांनी, तर पोदारकडून हसनैन अन्सारी याने गोलची नोंद केली.
...............

दृष्टिक्षेपात
- उपांत्यपूर्व लढतीत महाराष्ट्र हायस्कूलकडून छत्रपती शाहू विद्यालयाचा चार विरुद्ध शून्य गोलने पराभव
- दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत शाहू विद्यालयाकडून विद्यापीठ हायस्कूलचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव
- तिसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत शांतिनिकेतनकडून वसंतराव देशमुख स्कूलचा चार विरुद्ध एक गोलने पराभव
- चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत पोदार स्कूलकडून महावीर इंग्लिश स्कूलचा तीन विरुद्ध दोन गोलने पराभव
- पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र हायस्कूलकडून शाहू विद्यालयाचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव
- दुसऱ्या उपांत्य लढतीत शांतिनिकेतनकडून पोदार स्कूलचा दोन विरुद्ध शून्य गोलने पराभव, अंतिम फेरीत प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.