पाणीपुरवठा बंद

पाणीपुरवठा बंद

Published on

चंबुखडी टाकीजवळ
गळतीची दुरुस्ती
कोल्हापूर ः चंबुखडी टाकीजवळ थेट पाईपलाईनसाठी केलेल्या जोडातील गळतीची दुरुस्ती बुधवारी करण्यात आली. त्यामुळे सायंकाळी सी, डी वॉर्ड तसेच ई वॉर्डच्या काही भागांत कमी दाबाने पाणी मिळाले, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. थेट पाईपलाईन योजनेतून चंबुखडी टाकीला पाणी देण्यासाठी केलेल्या जोडणीच्या ठिकाणी गळती उद्‍भवली होती. त्याच्या दुरुस्तीचे काम करायचे झाल्यास पाणीपुरवठा बंद ठेवण्यासाठी उपसा बंद करावा लागणार होता. त्यानुसार बुधवारी उपसा बंद ठेवण्याचे नियोजन होते. त्यानुसार दुपारपर्यंत पाणीपुरवठा करून त्यानंतर उपसा बंद करण्यात आला. त्यामुळे सी, डी तसेच ई वॉर्डमधील भागातील पाणी बंद ठेवण्यात आले. ई वॉर्डमधील उंचावर असलेल्या भागात सकाळच्या सत्रातील पाणी बंद राहिले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती करून उद्यापासून पाणी वितरण करण्याचे नियोजन आहे. या दुरुस्तीनंतर थेट पाईपलाईनचे पाणी चंबुखडीला घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.