मराठा समाज निवेदन बातमी

मराठा समाज निवेदन बातमी

Published on

96244
...

मराठा विद्यार्थ्यांना तातडीने दाखले द्या
मराठा महासंघाची मागणी : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया नजिकच्या काळात सुरू होणार आहे. त्यावेळी एसईबीसी आरक्षणातून अर्ज करण्यासाठी त्यांना मराठा जातीचे दाखले आणि नॉन क्रिमिलेअर दाखला त्वरित मिळावा, अशी मागणी मराठा महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, मराठा जात दाखले व नॉन क्रिमिलेअर दाखले रद्द झाले होते. मात्र, आता ते पुन्हा घ्यावे लागणार आहेत. सध्या परीक्षा घोटाळ्यामुळे मेटाकुटीला आलेले विद्यार्थी व पालक यांच्यासाठी पुन्हा दाखल्याची प्रक्रिया राबवणे म्हणजे कडेलोटच आहे. या प्रक्रिया पुन्‍हा राबवायच्या झाल्यास कमीत कमी दीड ते दोन महिन्‍यांचा कालावधी लागणार आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी आरक्षणासाठी तातडीने अर्ज करावे लागणार असल्याने विद्यार्थी व पालक यांना मोठा धक्का बसलेला आहे. तरी नव्याने प्रवेश घेताना अडचणी येऊ नयेत यासाठी तातडीने दाखले मिळावेत. जे दाखले व्हॅलिडिटीसाठी सादर केलेले आहेत, त्यांची व्हॅलिडिटी आहे त्या दाखल्यावरच लगेच देण्यात यावी. ईबीसी सवलतधारक विद्यार्थ्यांचा जी.आर.मध्ये समावेश करावा. नॉन क्रिमिलेअरचे सर्टिफिकेट आहे हेच सर्टिफिकेट मान्य करण्यात यावे. यापूर्वी काढलेले मराठा जात प्रमाणपत्र व चारित्र्याचा दाखला हे नव्याने दाखले मिळेपर्यंत ग्राह्य धरावेत.
निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा संघटक संजय पवार (वाईकर), अवधूत पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश जाधव, किशोर डवंग, दीपक पाटील, प्रणव डाफळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.