ओबीसी नेते हाके दौरा

ओबीसी नेते हाके दौरा

Published on

प्रा. लक्ष्मण हाके यांची
शनिवारी रॅली, सभा
कोल्हापूर, ता. १० : राज्यातील ओबीसींना आधार देणारे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, कायदेतज्ज्ञ ॲड. मंगेश ससाणे आणि ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेंडगे शनिवारी (ता. १३) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता अक्कमहादेवी मंडप येथे सभा होणार आहे, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार, राज्य सचिव सयाजी झुंजार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी सकाळी १० वाजता किणी टोल नाका येथे प्रा. हाके, ॲड. ससाणे व श्री. वाघमारे यांचे स्वागत होईल. त्यानंतर रॅलीद्वारे नवे पारगाव, केखले मार्गे जोतिबा दर्शन, पन्हाळा येथे वीर शिवा काशिद स्मृती दिन कार्यक्रमात ते सहभागी होतील. त्यानंतर वाघबीळ, केर्ले मार्गे दुपारी एक वाजता शिवाजी पूल, गंगावेश येथे भोई समाज, रंकाळा स्टँड येथे नाभिक समाज स्वागत करतील. यानंतर अंबाबाई दर्शन, महाद्वार रोड, पापाची तिकटी येथे कुंभार समाजाच्या वतीने माजी महापौर मारुतराव कातवरे स्वागत करतील. बुधवार पेठ मार्गे ते राजर्षी शाहू समाधिस्थळी भेट देतील. शिवाजी चौक येथे वैश्य वाणी समाजाच्या वतीने माजी महापौर नंदकुमार वळंजू स्वागत करतील. बिंदू चौक येथे रॅली विसर्जित होणार आहे. यानंतर अक्कमहादेवी मंडप येथे सभा होणार आहे. पत्रकार परिषदेस माजी महापौर नंदकुमार वळंजू, मारुतराव कातवरे, ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, विजय घारे, बबन रानगे, सुनील गाताडे, ज्ञानेश्वर सुतार, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.