तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठका १६ पासून

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठका १६ पासून

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा
नियोजन बैठका १६ पासून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः तालुकास्तरीय, शालेय शासकीय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाबाबत १२ तालुक्यांतून व कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षकांच्या नियोजन बैठका १६ ते १४ जुलैदरम्यान आयोजित केल्या आहेत.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने या बैठकांचे आयोजन केले आहे. १६ जुलैला गडहिंग्लज-आजरा - माध्यमिक शिक्षक पतसंस्था, डॉक्टर कॉलनी, गडहिंग्लज (सकाळी १० वा.), तर चंदगडसाठी महात्मा फुले विद्यालय, कार्वे (दुपारी ३ वा.), १८ जुलैला राधानगरी -भुदरगड- दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालय, बिद्री (ता. कागल) (सकाळी ११ वा.), कागल-मुरगूड विद्यालय, मुरगूड (दुपारी ३ वा.), १९ जुलैला पन्हाळा-शाहूवाडी, गगनबावडा- फोर्ट इंटरनॅशनल स्कूल, वाघबीळ (सकाळी ११ वा.), २० जुलैला इचलकरंजी महापालिका- इचलकरंजी कौन्सिल हॉल, (सकाळी १० वा.), २३ जुलैला झेले हायस्कूल, जयसिंगपूर (स. ११ वा.), हातकणंगले - इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, पेठवडगाव (दुपारी ३ वा.), २४ जुलैला कोल्हापूर महापालिका- रामगणेश गडकरी हॉल, स. म. लोहिया हायस्कूल, (सकाळी ११ वा), करवीर- हनुमान विकास सेवा संस्था, ज्योतिर्लिंग सांस्कृतिक हॉल, (दुपारी ३ वा.) याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी पत्रकाद्वारे दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com