वारंगनांच्या व्यवसायासाठी जागा द्या

वारंगनांच्या व्यवसायासाठी जागा द्या

Published on

सखी संघटना, शिवशंभो फाउंडेशनचे
वारांगनांप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर, ता. १० ः स्वेच्छेने देहविक्री व्यवसाय करणे हे कायदेशीर असून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार दिला आहे. त्यामुळे या महिलांवर कारवाई करण्याआधी त्यांना व्यवसायाठी जागा निश्चित करून द्यावी, अशी मागणी सखी संघटना व शिवशंभो फाउंडेशनने निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, व्हिनस कॉर्नर परिसरात काही दिवसांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील वारांगनांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊन पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. याचा संघटनेतर्फे निषेध करतो. त्यांच्या आंदोलनामुळे या महिलांची रोजीरोटी बंद झाली आहे. हा व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य न्यायालयाने दिले आहे. जर कोणाला या व्यवसायात जबरदस्तीने आणले जात असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांचा आहे. मात्र, स्वेच्छेने व्यवसाय करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे शासनाने आधी या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.