गड-आयटीआय प्रवेश

गड-आयटीआय प्रवेश

Published on

विद्यार्थ्यांची पहिली यादी रविवारी
आयटीआय प्रवेशासाठी शुक्रवारी अखेरची मुदत

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची (आयटीआय) आनलाईन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. रविवारी (ता. १४) प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी सायंकाळी जाहीर होणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार (ता. १९) अखेर हजेरी द्यावयाची आहे. सोमवारपासून (ता. १५) पसंतीक्रम भरण्याची दुसरी फेरी सुरू होईल. यंदाही प्रवेशाच्या चार फेऱ्या होणार आहेत.
आयटीआयची राज्यस्तरावर केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गेल्या महिन्यात तीन जूनपासून सुरू झाली. विविध दाखले मिळवण्यात अडचणी आल्याने ही प्रक्रिया वाढविली होती. विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे होते. ३० जूनअखेर अर्ज करण्याची मुदत होती. चार जुलैला कच्ची, तर रविवारी (ता. ७) पक्की गुणवत्ता यादी जाहीर झाली. रविवारी सायंकाळी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी संकेतस्थळावर जाहीर होईल.
विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर प्रवेशाबाबत मेसेजही येणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पहिला विकल्प बंधनकारक राहणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे, शुल्क घेऊन संबंधित संस्थेत शुक्रवारअखेर हजेरी द्यायची आहे. सोमवारपासून दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरता येतील. दुसरी यादी २७ जुलैला जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या आहेत. चौथ्या फेरीनंतरही जागा रिक्त राहिल्यास संस्था स्तरावर पाचवी फेरी होऊ शकते.

चौकट..
प्रवेश अर्ज घटले
यंदा गतवर्षीपेक्षा प्रवेश अर्ज घटले आहेत. एकूण १ लाख ९६ हजार ४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत. गतवर्षी २ लाख १८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे गतवर्षीपेक्षा १७ हजारांनी अर्ज कमी आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.