संभाषण कौशल्यातून करीअरला वाव

संभाषण कौशल्यातून करीअरला वाव

Published on

chd113.jpg
96343
चंदगड : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. डी. एन. मिसाळे.
-----------------
संभाषण कौशल्यातून करिअरला वाव
डॉ. मिसाळे : माडखोलकर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : संभाषण कौशल्यातून सेवा क्षेत्रामध्ये करिअरला मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात केल्यास करिअर घडू शकते, असे मत निवृत्त प्राचार्य डॉ. डी. एन. मिसाळे यांनी व्यक्त केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या करिअर व कौन्‍सिल सेलतर्फे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल अध्यक्षस्थानी होते.
मिसाळे म्हणाले, ‘अभ्यासातील सातत्य, चिकाटी व धाडस याच्‍या जोरावर निश्चित यश मिळवता येते. त्याचबरोबर विविध कौशल्ये आत्मसात केल्यास करिअरची वाट सुकर होते.’ प्रवीण केळुसकर यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात असलेल्या संधीबाबत माहिती दिली. डॉ. गोरल म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. योग्य वेळी योग्य माहिती मिळाल्यास त्या क्षेत्रात ते यश मिळवू शकतात. हाच हेतू ठेवून महाविद्यालय विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन करीत आहे.’ डॉ. जी. वाय. कांबळे, डॉ. एस. डी. गावडे, डॉ. ए. वाय. जाधव, डॉ. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एस. एस. सावंत, आदी उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. एन. साळुंके यांनी आभार मानले. तर डॉ. एन. एस. मासाळ यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.