‘लाडकी बहीण योजने’साठी
८१ प्रभागात केंद्र सुरू करा

‘लाडकी बहीण योजने’साठी ८१ प्रभागात केंद्र सुरू करा

Published on

96413
कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.


‘लाडकी बहीण योजने’साठी
८१ प्रभागांत केंद्र सुरू करा
के. मंजुलक्ष्मी : आढावा बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून शहरातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळण्यासाठी सर्व ८१ प्रभागांत अर्ज स्वीकारण्यासाठी केंद्र सुरू करा. महिलांची कोणतीही अडवणूक, दिरंगाई, पैशाची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.
आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत या सूचना केल्या. प्रशासक के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘योजनेसाठी ‘नारी शक्ती दुत’ या ॲपवर मोफत ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय आहे. पात्र महिला बचत गटांना व प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतील महिलांना सामावून घेऊन योजनेचा लाभ द्यावा. अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली चारही विभागीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन आढावा घ्यावा. विभागीय कार्यालयातील सुविधा केंद्रात, ५४ शाळांमध्ये, नागरी आरोग्य केंद्रामध्ये अथवा स्वच्छता ऑफिसमध्ये ८१ अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्याचे नियोजन करावे. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या महिलांनाही लाभ मिळण्यासाठी तिथे पथक नेमण्यात यावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे प्रत्येक प्रभागात काम करताना घरोघरी फॉर्मचे वाटप करावे. अंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी अर्ज भरून घेऊन ते ऑनलाईन अपलोड करावेत. शहरातील सर्व सेतू केंद्रांनी जास्तीत जास्त फॉर्म अपलोड करावेत याकडे लक्ष द्यावे. अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे शुक्रवारी (ता.१२) सकाळी दहा वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रशिक्षण घेण्यात यावे.’’
अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त साधना पाटील, पंडित पाटील, सहायक आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता सतीश फप्पे, आर. के. पाटील, रमेश कांबळे, महादेव फुलारी, सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.