सहकार बारची निवडणूक बिनविरोध

सहकार बारची निवडणूक बिनविरोध

फोटो- 96436

सहकार बार असोसिएशनच्या
अध्यक्षपदी ॲड. प्रबोध पाटील

बिनविरोध निवडणूक; उपाध्यक्षपदी ॲड. भरत घोरपडे

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः जिल्हा सहकार बार असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये ॲड. प्रबोध पाटील याची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष ॲड. भरत घोरपडे यांची निवड झाली. सचिवपदी ॲड. विशाल सरनाईक, सहसचिवपदी ॲड. अमोल पाटील, लोकल ऑडिटर ॲड. मनोज कदम, महिला प्रतिनिधी ॲड. अनुजा भोसले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष ॲड. किरण मुंगळे यांचे अध्यक्षतेखाली आज झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.
यावेळी सहकार बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील के. डी. पवार, संदीप घाटगे, सर्जेराव खोत, उमेश माणगावे, अभिजित कापसे, संजय डिक्रुज, राहुल देसाई, नामदेवराव साळोखे, प्रशांत पाटील, सागर संकपाळ, संकेत सावर्डेकर, अंकुश भांदिगरे, शिवानी पोवार, नागेश जंगमस्वामी, जगजित अडनाईक आदी उपस्थित होते. सहकार क्षेत्रात वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नूतन पदाधिकाऱ्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com