शिवसेना मेळावा

शिवसेना मेळावा

Published on

शिवसेना
ठाकरे गटाचा
रविवारी मेळावा

कोल्हापूर ः विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा रविवारी (ता. १४) कोल्हापुरात होत आहे. राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा मेळावा होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाची पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी माजी मंत्री व फायर ब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जाधव यांच्याच उपस्थितीत रविवारी हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात कोल्हापूर उत्तर, दक्षिणसह करवीरमधील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. सद्यस्थितीत या तिन्ही मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या तीन जागा मिळवताना शिवसेना ठाकरे गटाला मोठी ताकद लावावी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.