कोल्हापूरची पोरं खेळात ‘लै भारी’

कोल्हापूरची पोरं खेळात ‘लै भारी’

Published on

एकत्रित खेळ असलेला फोटो किंवा क्लिपार्ट टाकावे.....
..................
कोल्हापूरची पोरं खेळात ‘लै भारी’

दीडशेहून अधिक खेळाडूंना मिळाली नोकरी ः इतर संधीचेही केले सोने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ‘क्रीडानगरी’ म्हणून कोल्हापूरचा देशभरात गवगवा होत आहे. कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, रग्बी, बॅडमिंटन, सॉफ्टबॉल, कबड्डी, खो-खो अशा खेळांतून स्थानिक खेळाडू आशियाई ते ऑलिंपिकपर्यंत मजल मारू लागले आहेत. याशिवाय दीडशेहून अधिकजणांना राज्य, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये थेट नोकरीच्या संधी मिळाल्या. याशिवाय खेळांतूनच राष्ट्रीय पातळीवर व्यवस्थापक, स्कोरर, व्हिडिओ विश्‍लेषक, फिजिओ, प्रशिक्षक अशा एक ना अनेक संधीही मिळवल्या आहेत.
तब्बल ७२ वर्षांनी कांबळवाडी (ता. राधानगरी) येथील स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिंपिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले. तो रेल्वेत तिकीट तपासणीस म्हणून यापूर्वीच नोकरीत होता. ऑलिंपिकमधील कामगिरीची दखल घेत रेल्वे खात्याने त्याला ‘ऑन ड्युटी स्पेशल ऑफिसर’ म्हणून पदोन्नती दिली. यासह रग्बी खेळातून पाडळी खुर्द येथील वैष्णवी पाटील, कल्याणी पाटील यांनी आशियाई स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. उचगाव (ता. करवीर) येथील आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटनपटू आरती पाटीलने तर आशियाई, विश्‍वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर तिला प्राप्तिकर विभागात थेट नियुक्ती मिळाली. एवढेच काय मैदानी स्पर्धेतील यशामुळे सचिन पाटीलला वर्ल्ड क्रॉस कंट्रीत कांस्यपदक मिळाले. यासह अन्य कामगिरीच्या जोरावर त्याला प्राप्तिकर विभागात नोकरी मिळाली. त्याच्यासह अन्य ४५ जणांना रेल्वे, पोलिस, लष्कर, प्राप्तिकर विभागांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. फुटबॉलमधून संकेत साळोखे (पोस्ट), पवन माळी (रेल्वे), संकेत वेसणेकर, अक्षय घाटगे, अभिषेक भोपळे, सुमित घाटगे (पोलिस) यांना नोकरीची संधी मिळाली. सॉफ्टबॉलमध्ये रिक्षका शिरगावे, स्वप्नील वायदंडे यांना उपशिक्षणाधिकारी म्हणून नोकरीत संधी मिळाली. अशा एक ना अनेक खेळांतून वर्षभरात १४८ जणांना नोकरीची संधी मिळाली.
.......
खेळातूनही संधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ज्यांना क्रिकेट खेळातून संधी मिळाली नाही, अशा खेळाडूंसाठी व्हिडीओ ॲनॅलिस्ट, पीच क्युरेटर, ट्रेनर, नेट बॉलर, आर्म थ्रो स्पेशालिस्ट, व्यवस्थापन समन्वयक, फिजिओ थेरपीस्ट, स्कोरर, निवेदक अशा परीक्षांचे आयोजन केले आहे. त्यातून महाराष्ट्राच्या रणजी संघाला व्हिडीओ ॲनॅलिस्ट म्हणून कोल्हापूरच्या स्वप्नील कदमला नियुक्त केले आहे. गेली तीन वर्षे तो या पदावर कार्यरत आहे.
..........
कर्तृत्ववान खेळाडू असे ः
नेमबाज तेजस्विनी सावंत (क्रीडा उपसंचालक तथा विशेष अधिकारी), राही सरनोबात (उपजिल्हाधिकारी), राधिका बराले-हवालदार (रेल्वे अधीक्षक), जितेंद्र विभूते (रेल्वे), नवनाथ फरताडे (क्रीडा उपसंचालक), संदीप तरटे (क्रीडा मार्गदर्शक), शाहू माने (रेल्वे टीसी), स्वप्नील कुसाळे (रेल्वे, ओएसडी), जलतरणातून वीरधवल खाडे (तहसीलदार), मंदार दिवसे (वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय पोलिस दल), कुस्तीतून ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटील (सैन्य दल), रग्बीपटू वैष्णवी पाटील, कल्याणी पाटील, श्रीधर निगडे, संकेत पाटील, करण शिंदे आदी ३६ जणांना प्राप्तिकर, पोस्ट, पोलिस दलात नोकरी, ॲथलेटिक्समधून सचिन पाटील, आश्‍लेश मस्कर, बाळासाहेब निकम (प्राप्तिकर), सॉफ्टबॉलमधून २८ जणांना केंद्र, राज्य सरकारच्या विविध खात्यांत नोकऱ्या मिळाल्या. हॉकीतून पोलिस, पोस्ट, प्राप्तिकरमध्ये अनेक खेळाडूंना नोकरी मिळाली. याशिवाय आंतरराष्ट्रीय हॉकीपंच रमा पोतनीस, श्‍वेता पाटील, सिद्धी जाधव यांनीही पंच म्हणून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कामगिरी केली आहे. बास्केटबॉलमध्ये ‘फिबा’मध्ये आंतरराष्ट्रीय पंच स्नेहल बेंडके उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत.
..........
कोट...
कुस्ती, फुटबॉल, नेमबाजी, जलतरणसोबत मैदानी स्पर्धेतही कोल्हापूरची मुले चमकदार कामगिरी करीत आहेत. या कामगिरीच्या जोरावरच त्यांना केंद्र, राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये थेट नियुक्ती मिळाली आहे.
- प्रकुल मांगोरे-पाटील, प्रशिक्षक, ॲथलेटिक्स
.........
कोट...
खेळातूनच करिअरच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे सॉफ्टबॉल या खेळातून कोल्हापूरच्या २८ जणांना राज्य, केंद्र सरकारच्या विविध खात्यांत नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.
- संदीप लंबे, सॉफ्टबॉल प्रशिक्षक
....
कोट
क्रिकेट खेळातून संघात स्थान मिळाले नाही. तरीसुद्धा बीसीसीआय, एमसीए कडून स्कोरर, व्हिडीओ ॲनॅलिस्ट, फिजिओ, व्यवस्थापक आदी परीक्षातून काम करण्याची संधी मिळत आहे.
- चंदाराणी कांबळे, आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू
....
कोट...
नेमबाजीत अचूक लक्ष्य साध्य केल्यानंतर विजेतेपद आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळत आहेत.
- रोहित हवालदार, राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक
.....
कोट
हॉकीमधूनही नोकरीसह पंच, ऑपिशियल, प्रशिक्षक म्हणून संधी मिळत आहेत.
- संदीप जाधव, हॉकी संघटक
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com