

‘गोकुळ’मधील टँकरचा व्यवसाय
बंद झाल्याचे दु:ख ः सतेज पाटील
गोंधळ घालणं ही महाडिक यांची वृत्ती
कोल्हापूर, ता. ३० : गोंधळ घालणं ही महाडिकांची वृत्ती आहे. आरोप करणाऱ्या संचालिका गोकुळ दूध उत्पादकांच्या हितासाठी आलेल्या नाहीत. त्यांना त्यांचे टँकरचा व्यवसाय बंद झाल्याचे दु:ख आहे. त्याच दु:खापोटी त्यांचे आंदोलन सुरू आहे. गोकुळ संचालकांच्या बैठकीला जायचे नाही, गेले तर आपली मते मांडायची नाहीत. गोकुळच्या सर्वसाधारण सभेत मात्र टीआरपी मिळवण्यासाठी धडपड करण्याचे काम केले जात असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी शौमिका महाडिक यांच्यावर आज केली.
आमदार पाटील म्हणाले, ‘पशुवैद्यकीय कॉलेज सुरू व्हावे, हे राज्य शासनाने धोरण स्वीकारले आहे. यावरच गोकुळने शासनाने मदत केली तरच हे कॉलेज स्थापन करायचे असा ठराव केला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे कॉलेज सुरू करायचे आहे. कोणत्याही खासगी संस्थेला देण्याचा प्रश्न येत नाही. कोणत्याही संस्थेला हे कॉलेज चालवायला घेता येत नाही. लोकांपर्यंत जाण्यासाठी विरोधकांना कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे गोकुळचे खासगीकरण होणार म्हणून त्या खोट सांगत आहेत. सभासदांनी गोकुळ आमच्याकडे विश्वासाने दिला आहे. भविष्यातही गोकुळ आमच्याकडेच राहणार असल्याची त्यांना खात्री झाल्यामुळे आता खोट बोलण्याचे काम करत आहेत. गोकुळला सभा चालवायची आहे. विरोधकांना गोंधळ घालायचा आहे. तो त्यांनी घातला आहे.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.