अरुण डोंगळे गोकुळ

अरुण डोंगळे गोकुळ
Published on

शौमिका महाडिक यांना निवडणूक
महत्त्‍वाची ः अरुण डोंगळे

सासऱ्याकडे ३५ वर्ष संघ होता हे विसरल्या का?

कोल्हापूर, ता. ३० : शौमिका महाडिक यांना गोकुळची सभा महत्त्‍वाची नाही. त्यांच्या डोक्यात तीन ते चार महिन्यांनी होणारी निवडणूक आहे. त्यामुळेच ते गोकुळच्या सभेत झेंडा नाचवून घोषणाबाजी करत होत्या, अशी टीका ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केली. सर्वसाधारण सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाडिक यांना जनतेने व्यासपीठावर बसण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, त्यांना खालीच बसायचे असते. यात ‘गोकुळ’चा दोष काय? असाही सवाल डोंगळे यांनी केला.
डोंगळे म्हणाले, ‘महाडिक यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तर पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे आज गोंधळ घालण्याची गरज नव्हती. मात्र, महाडिक यांना ‘गोकुळ’च्या सभेपेक्षा कोणत्या तरी मतदारसंघासाठी महत्त्‍वाचा हा विषय आहे. नेत्यांसाठीच सभा असल्याचे सांगणाऱ्या शौमिका महाडिक संचालक मंडळाच्या किती सभेला उपस्थित असतात, त्या सभासदांचे किती प्रश्‍न पोटतिडकीने मांडतात. संचालक म्हणून कर्तव्य पार पाडतात का? हे पाहावे. ‘गोकुळ’ आपले म्हणाल्या तर विकास होईल. पण, शौमिका महाडिक यांची ती भूमिका नाही. महाडिक यांच्या सासऱ्यांकडे ३५ वर्ष संघ होता, हे त्या विसरल्या आहेत. गोकुळला त्या आपले समजत नाहीत, याचे आत्मपरीक्षण करावे. सहकारात आपली मते अभ्यासपूर्ण मांडली पाहिजेत. तुम्ही चौघे विजयी झाला. मग तिघे संचालक गेले कुठे? केवळ महाडिक एकट्याच टीका कशा करतात हे लक्षात घेतले पाहिजे.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com