केशवराव भोसले नाट्यगृह जळीतप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

केशवराव भोसले नाट्यगृह जळीतप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा
Published on

नाट्यगृह जळीतप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानंतर कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळीतप्रकरणी आज रात्री साडेअकराच्या सुमारास अज्ञाताविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत नाट्यगृहाचे व्यवस्थापक समीर ईस्माईल महाब्री (वय ४८, रा. शहाजी वसाहत) यांनी फिर्याद दिली. दुपारीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे व महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना दिले होते. त्यानुसार तातडीने पावले उचलत पोलिसांकडून ही कार्यवाही करण्यात आली.
८ ऑगस्ट रोजी नाट्यगृह व खासबाग मैदानामधील स्टेजला आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी महापालिका प्रशासनाने आगीची वर्दी दिल्यानंतर पोलिसांनी केवळ जळीत म्हणूनच नोंद केली होती. दरम्यान, आज सकाळी शासकीय विश्रामगृह येथे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना आदेश दिले. त्यानुसार रात्री साडेअकराच्या सुमारास जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, नाट्यगृहाचे व्यवस्थापक महाब्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाट्यगृहाच्या पाठीमागील बाजूस खासबाग मैदानाच्या स्टेजला कोणी तरी अज्ञाताने आग लावली असावी, त्यानंतर ती आग पुन्हा नाट्यगृहाला लागून त्यामध्ये १६ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजीव झाडे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com