राहुल गांधी कोल्हापूरात

राहुल गांधी कोल्हापूरात
Published on

राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापुरात
कसबा बावड्यातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणासह विविध कार्यक्रम

कोल्हापूर, ता. ३ : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्यापासून (ता. ४) दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर त्यांचे आगमन होईल. सायंकाळी ६ वाजता श्री. गांधी कसबा बावडा येथील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील.
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार रजनी पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहम्मद अरीफ नसीब खान यांच्यासह राज्यातील नेते तसेच काँग्रेस आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, राहुल पाटील उपस्थित असतील.
शनिवारी (ता. ५) संविधान सन्मान संमेलनादरम्यान सयाजी हॉटेल येथे सकाळी ९ ते ९.४५ दरम्यान चळवळीतील गीत गायन, त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध विषयांवर परिसंवाद होईल. वारकरी परंपरा आणि भारतीय संविधान, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान, महिला व संविधानातील समता मूल्य, राजर्षी शाहू महाराज सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, जातीवार जनगणना या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी १.४५ ते २.१५ दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी २.१५ ते ४ या वेळेत होणाऱ्या समारोप कार्यक्रमात राहुल गांधी सर्वांशी संवाद साधतील. याच दिवशी सायंकाळी पॅव्हेलियन मैदानावर तब्बल २ हजार कलाकार शिवाजी महाराजांवरील महानाट्य सादर करतील. यामध्ये एक हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारतील.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. हा इतिहास जसाच्या तसा पोहोचला पाहिजे. यासाठी हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी शिवप्रेमी, सर्व जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाने आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. यावेळी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज संजय पाटील, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com