

फोटो 20660
कामाचे मोजमाप करूनच मतदान करा
हसन मुश्रीफ; कडगाव-कौलगे परिसरात कार्यकर्त्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २२ ः विधानसभेच्या निवडणुकीत मला आंधळेपणाने मतदान करू नका. माझी आणि समोरच्या विरोधी उमेदवाराची तुलना आणि माझ्या एकूण कामांचे मोजमाप करूनच मतदान करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कडगाव-कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघातील बड्याचीवाडी, लिंगनूर, वडरगे, बेकनाळ, जख्खेवाडी, कडगाव, गिजवणे येथे आयोजित कार्यकर्ता संपर्क बैठकांमध्ये ते बोलत होते.
या परिसरात मला पहिल्यांदा स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी आणून आपल्या जिवाभावाचे कार्यकर्ते माझ्याकडे दिले आणि सांगितले की, या कार्यकर्त्यांची मनापासून जपणूक करा. त्यांचा शब्द प्रमाण मानून मी येथील सर्वच कार्यकर्त्यांची जीवापाड जपणूक करत आलो आहे. त्यांना योग्य मान- सन्मान देण्यात कधीच कमी पडलो नाही. कार्यकर्तेच माझी ऊर्जा असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी गाव-खेड्यांत दळणवळण, पिण्याचे पाणी व इतर सर्व मूलभूत गरजांची पूर्तता केल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांनी बड्याचीवाडीत कोट्यवधीच्या विकास निधीतून भरीव काम केल्याचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अशोक खोत यांनी सांगितले.
या बैठकवेळी मारुती राक्षे, शंकर डवरी, वडरगे येथे पंचायत समिती गडहिंग्लजच्या माजी सभापती शीला जाधव, सरपंच सुभाष पोटे, उपसरपंच संगीता खोत, भाजप महिला गडहिंग्लज तालुका अध्यक्ष अॅड. परमेश्वरी पाटील, सरपंच कमल कुडचे, दीपक राजगोळे, बापूसाहेब कुरळे, जखेवाडी येथे सरपंच वैशाली गिरी, उपसरपंच ज्योती पाटील, संदीप पाटील, कडगाव येथे सरपंच अर्चना पाटील, उपसरपंच सचिन सावंत, सदानंद पाटील, नेताजी पाटील, तर गिजवणे येथे सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच आदित्य पाटील, तालुका संघाचे उपाध्यक्ष रमेश पाटील, माजी सरपंच रंजना चव्हाण आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.