

19424 25. 26 . 27. 28. 29. 30. 31
फोटो स्टोरी
मोहन मेस्त्री
19424; 19425, 19426; 19427; 19428; 19429; 19430; 19431
अशी पाखरे येती ....
कोल्हापूर : सतत शेपटीच्या हालचाली करणाऱ्या राखी वटवट्याने घराभोवती फेऱ्या मारायला सुरवात केली. अखेर जास्वंदीच्या झाडाच्या फांदीवर त्याला सुरक्षित जागा वाटल्याने घरटे बांधण्यास सुरवात केली. पानांची वीण करत आत काट्यांचा गोल आकार तयार झाला. काही दिवसांनी घरटे पूर्ण झाले, पण पक्ष्याचा आकार आणि घरटे पाहून पक्षीण अंडी उबविणार कशी, याचेच कोडे वाटले.
चौथा दिवस ः चार दिवसांनंतर चार लाल अंडी दिसली. वटवट्या मादीचा केवळ आवाज यायचा. बारावा दिवस ः घरट्यात एक-दोन पिलांचे दर्शन झाले. चौदावा दिवस ः चार पिली दिसली. इवल्याशा चोची उघडून आईकडून भरवायची वाट बघत होती. डोळे उघडलेले नव्हते. पंधरावा दिवस ः या दिवशी मांसाच्या गोळ्यांना पंखांचे काळसर भाले दिसू लागले. सोळावा दिवस ः या भाल्याना पंखांचा आकार दिसू लागला आणि घरट्यातच एकमेकाच्या अंगावर बसून पिलांनी चोच उघडल्यानंतर आतील पिवळाजर्द भाग दिसू लागला. झाडाची फांदी हलली तरी खाऊच्या अपेक्षेने पिले चोच पसरून वर येण्याचा प्रयत्न करत होती. आई चोचीमध्ये खायला किडे, आळी आणून पिलांना भरवायची. एकोणीसवा दिवस ः पिलांना पक्ष्याचे रूप प्राप्त झाले होते, पिसे दिसत होती. चोच आकारात आली होती. एकवीसावा दिवस ः यातील पिलू घरट्यावरील पानाच्या देठावर आरामात बसले होते. दुसऱ्या पिल्याने घरट्याबाहेर डोके काढले होते. चोविसावा दिवस ः पिलू फांदीवर आरामात आईची वाट बघत बसले होते. तीन आठवडे घरट्यातील पिलांना बघायची सवयच झाली होती, परंतु पिले गेल्यानंतरच रिकाम्या घरट्याकडे पाहावेसे वाटेना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.