काँग्रेसकडून व्ही.व्ही.पॅट तपासणीची मागणी

काँग्रेसकडून व्ही.व्ही.पॅट तपासणीची मागणी
Published on

व्हीव्हीपॅटच्या मतांची
फेरमोजणी व्हावी
काँग्रेस उमेदवारांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : विधानसभा निवडणुकीत पोषक वातावरण असताना राज्यात महाविकास आघाडीच्या उमदेवारांना पराभव पत्करावा लागल्याचे कारण सांगत महाविकास आघाडी घटक पक्षांकडून राज्यात ईव्हीएमविरोधात लाट उसळली आहे. यातच आता जिल्ह्यातील करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, शिरोळ विधानसभा मतदारसंघांतील व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासाठी आवश्‍यक असणारे शुल्कही भरले आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण होते. लोकांकडून काँग्रेसला मिळणार प्रतिसादही चांगला होता; मात्र, ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटमध्ये मतदानामध्ये फरक दिसत असल्याची उदाहरणे राज्यभरातून समोर येत आहेत. लोकांनी प्रत्यक्ष केलेले मतदान, मोजलेली मते, मतदान केंद्रावर असणारी एकूण मते आणि झालेल्या मतांमध्ये फरक दिसून येत असल्याने शंका निर्माण झाली आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांनी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमधील झालेल्या मतांची नव्याने तपासणी आणि मोजणी करण्याची मागणी केली आहे. करवीर मतदारसंघातील राहुल पाटील, दक्षिणमधून ऋतुराज पाटील, उत्तरमधून राजेश लाटकर, हातकणंगलेमधून राजू आवळे व शिरोळमधून गणपतराव पाटील यांनी ही मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com