

37071
साहिल पाटील
.....
सागरमाळ, रमेश कदम अकादमी विजयी
प्रा. संजय देसाई स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा ः साहिल पाटील चमकला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः प्रा. संजय देसाई स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सागरमाळ स्पोर्टस् असोसिएशनने वेद स्पोर्टसचा सहा गडी राखून, तर रमेश कदम क्रिकेट अकादमीने कॅलेक्स स्पोर्टसचा ३६ धावांनी पराभव केला.
डी. वाय. पाटील मैदानावर पहिला सामना सागरमाळ व वेद स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना वेद स्पोर्टसने २० षटकांत ८ बाद ११६ धावा केल्या. यात जितू माळवीने ३०, तर सागर पाटीलने २३ धावा केल्या. गोलंदाजी करताना सागरमाळकडून साहिल पाटीलने तीन गडी, तर अलोक कानेटकरने दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना सागरमाळ संघाने हा सामना १३ षटके दोन चेंडूंत चार गड्यांच्या मोबदल्यात ११९ धावा करीत जिंकला. यात प्रियतेश भोसलेने नाबाद ५६, अलोक कानेटकरने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना वेद स्पोर्टसकडून लक्ष्मण सुतारने दोन, ओंकार निकम, संदीप खवरेने प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसरा सामना रमेश कदम क्रिकेट अकादमी व कॅलेक्स स्पोर्टस् यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना कदम अकादमीने सर्वबाद १४४ धावा केल्या. यात वृषभ लट्टेने २९, करण वाघमोडेने २६ धावा केल्या. गोलंदाजी करताना संग्राम पाटीलने तीन, नितीन राऊत, सनी लुगडे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना कॅलेक्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १८ षटकांत १०८ धावांत गुंडाळला. यात वैभव पाटीलने ३०, नितीन राऊतने १९, नजीर शेखने १५ धावा केल्या. गोलंदाजी करताना कदम अकादमीकडून प्रेम ननवरेने तीन, रोहन सावंत, वसीत मुल्लानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.