

37093
अर्जुन घोरपडे
......
37092
युगंधर दरेकर
..............
लोगो ः वसंतराव चौगुले क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर जिल्हा संघाकडून
एस. पी. अकादमी पराभूत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः वसंतराव चौगुले (ब) गट एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा १४ वर्षांखालील संघाने एस. पी. क्रिकेट अकादमीचा पाच गडी राखून पराभव केला. अर्जुन घोरपडेने अर्धशतक, युगंधर दरेकरचे तीन बळी हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर आज या दोन संघांत सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना एस. पी. क्रिकेट अकादमीने ३३ षटके एक चेंडूत सर्वबाद १८९ धावा केल्या. यात आदित्य सरोलीकरने ४६, जोतिबा पाटीलने ३३, वैभव आंबूलकरने २५, तबरेज अलाखानने १९, राकेश चिलमीने १६, समीर चौगुलेने १३ धावा केल्या. जिल्हा संघाकडून युगंधर दरेकरने तीन, प्रसाद नाईकने दोन, पृथ्वीराज कोकाटे, शिवजित इंदुलकर, विहान लट्टा व संस्कार पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना जिल्हा संघाने ३९ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. यात अर्जुन घोरपडेने ५१ धावांची अर्धशतकी, तर संस्कार पाटीलने ४४, आयुष चाळकेने ३२, शिवजित इंदुलकरने २१, वीरेन कोळकीने १२ धावा केल्या. गोलंदाजी करताना एस. पी. क्रिकेट अकादमीकडून राकेश चिलमी व तबरेज अलाखान यांनी प्रत्येकी दोन, तर जोतिबा पाटीलने एक गडी बाद केला. मात्र, त्यांना जिल्हा संघाला विजयापासून रोखता आले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.