पोलिसवृत्त

पोलिसवृत्त
Published on

पहिल्या मजल्यावरून
पडून एक जखमी

कोल्हापूर ः नागाव (ता. हातकणंगले) येथे बांधकामावरील सेंट्रिंगचे साहित्य उतरविताना पहिल्या मजल्यावरून पडल्याने राजू हरी वायदंडे (वय ४५, रा. कागल) जखमी झाले. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
........................

मडिलगेत मारहाणीत
तिघेजण जखमी
कोल्हापूर ः मडिलगे बुद्रूक (ता. भुदरगड) येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले. मनोज नारायण हजारे (वय ३२), छाया नारायण हजारे (५६) व अनिकेत उत्तम भांदिगरे (२२) अशी जखमींची नावे आहेत. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
..............
परप्रांतीय कुटुंबीय
हाणामारीत जखमी

कोल्हापूर ः शिरोली एमआयडीसी येथे झालेल्या मारहाणीत महिलेसह तिघे जखमी झाले. शोभादेवी गणेश पासवान (वय ३५), उत्तमकुमार गणेश पासवान (१३), गणेश चंद्रिका मांझी (सर्व रा. बिहार, सध्या रा. शिरोली) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सोमवारी रात्री सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
................
अन्नातून विषबाधा झाल्याने
दांपत्य इस्पितळात दाखल

कोल्हापूर ः जेवणातून विषबाधा झाल्याने दांपत्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. प्रणिशा सत्यजित शिंदे (वय २२) व सत्यजित धनाजी शिंदे (२९, दोघे रा. कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
......................
भिंत अंगावर पडून
वृद्ध जखमी

कोल्हापूर ः सुभाषनगर येथे काम करताना घराची भिंत अंगावर पडून साताप्पा नाना कांबळे (वय ६०, रा. दऱ्याचे वडगाव, करवीर) जखमी झाले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. रात्री अकराच्या सुमारास त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com