

51889
कोल्हापूर ः डेरवणसह कोल्हापुरात झालेल्या नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या वेध रायफल शूटिंग अकादमीच्या नेमबाज.
......
वेध अकादमीच्या खेळाडूंची
नेमबाजीत २३ पदकांची कमाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः डेरवण (जि. रत्नागिरी) येथे झालेल्या यूथ गेम्स व कोल्हापुरात आयोजित केलेल्या पेटाळा स्कूल गेम्समध्ये वेध रायफल व पिस्तूल शूटिंग अकादमीच्या नेमबाजांनी आठ सुवर्ण, सात रौप्य आणि आठ ब्राँझ अशी एकूण २३ पदकांची कमाई केली.
डेरवण यूथ गेम्समध्ये १४ वर्षांखालील खुल्या गटात मुलींमध्ये भार्गवी पाटील (सुवर्ण), सान्वी घाटगे (रौप्य) , तर मुलांमध्ये ऋग्वेद खोत (सुवर्ण), चिन्मय भुईंबर (रौप्य), आदित्य पाटील (ब्राँझ). १७ वर्षांखालील ओपन साईट एअर रायफल प्रकारात तीर्थ पवार (सुवर्ण), शिवेंद्र खतकर (रौप्य), तर मुलींमध्ये स्नेहांकिता चौगुले (ब्राँझ). १४ वर्षांखालील पीपसाईट एअर रायफल प्रकारात मुलांमध्ये शर्व घुगरे (रौप्य), १७ वर्षांखालील पीपसाईट एअर रायफल प्रकारात वरदराज पवार (सुवर्ण), तर मुलींमध्ये हिरण्या सासने (सुवर्ण), काव्यांजली नकाते (रौप्य), युगरत्न शर्मा (ब्राँझ).
पेटाळा स्कूल गेम्सअंतर्गत १० मीटर ओपन साईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षांखालील गटात ऋग्वेद खोत (सुवर्ण), आदित्य पाटील (रौप्य), सोहम लंबे (ब्राँझ). मुलींमध्ये भार्गवी पाटील (सुवर्ण), सान्वी घाटगे (ब्राँझ). १७ वर्षांखालील मुलांमध्ये शिवेंद्र खतकर (रौप्य), तीर्थ पवार, सोहम शेळके (ब्राँझ), तर मुलींमध्ये स्नेहांकिता चौगुले (सुवर्ण), पद्मजा पाटील (ब्राँझ) यांचा समावेश होता. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय नेमबाज राधिका बराले-हवालदार, रोहित हवालदार, धैर्यशील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.