आजरा, पन्हाळा तालुका क्रिकेट असोसिएशन विजयी

आजरा, पन्हाळा तालुका क्रिकेट असोसिएशन विजयी
Published on

55506
सोहम चौगले
...........
आजरा, पन्हाळा तालुका असोसिएशन विजयी

आंतर तालुका क्रिकेट स्पर्धा ः सोहम चौगले, संकल्प कांबळेचे यश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः ‘केडीसीए’आयोजित स्वर्गीय केशवराव गयावळ १९ वर्षांखालील आंतर तालुका टी-२० क्रिकेट स्पर्धेत आजरा तालुका क्रिकेट असोसिएशन व पन्हाळा तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
जिवबानाना जाधव पार्क येथील भाऊराव पाटील क्रिकेट मैदानावर पहिला सामना आजरा व हातकणंगले तालुका क्रिकेट असोसिएशन या दोन संघांत झाला. प्रथम फलंदाजी करताना हातकणंगले संघाने ९ षटके ५ चेंडूंत सर्वबाद ३५ धावा केल्या. यात रुद्र पाटीलने १३ धावा केल्या. आजरा संघाकडून संकल्प कांबळेने पाच, समर्थ चव्हाणने तीन, आदित्य शिवणेने एक गडी बाद केला. उत्तरादाखल खेळताना आजरा संघाने हा सामना ७ षटके २ चेंडूंत चार गड्यांच्या मोबदल्यात ३६ धावा करीत जिंकला. यात आदित्य शिवणेने नाबाद १०, संकल्प कांबळेने ७ धावांचे योगदान दिले. हातकणंगलेकडून आरुष सुतारने दोन, ओमकार सुवासे, पार्थ पोवार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात पन्हाळा तालुका क्रिकेट असोसिएशनने गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशनचा ६६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पन्हाळा संघाने २० षटकांत ६ बाद ११७ धावा केल्या. यात सोहम चौगलेने नाबाद ५९, सिद्धेश पोवारने २३, तेजस रोकडेने १६ धावा केल्या. गगनबावडा संघाकडून रोहन भुताळने तीन, विक्रम डाकवेने दोन गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना गगनबावडा संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ ८ षटकांत ४१ धावांत गुंडाळला. यात रितेश पाटीलने १९ धावांचे योगदान दिले. गोलंदाजी करताना पन्हाळा संघाकडून सिद्धेश पवारने तीन, तर सोहम चौगलेने दोन, शिवराज मुगडे, हर्षल कांबळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com