‘दिलबहार’, ‘बालगोपाल’ पुढील फेरीत

‘दिलबहार’, ‘बालगोपाल’ पुढील फेरीत
Published on

55555
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
..............
लोगो ः चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा

‘दिलबहार’, ‘बालगोपाल’ पुढील फेरीत

सुभाषनगर फुटबॉल क्लब, प्रॅक्टिस पराभूत ः सिंगेटकोम, प्रथम भोसले ‘सामनावीर’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने सुभाषनगर फुटबॉल क्लबचा, तर यजमान बालगोपाल तालीम मंडळने तुल्यबळ प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’चा पराभव करीत पुढील फेरीत प्रवेश केला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ विरुद्ध नवख्या सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात सामना रंगला. सुरुवातीपासूनच ‘दिलबहार’ने शॉर्ट पासिंगचा अवलंब करीत सुभाषनगर संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या सहाव्या मिनिलास प्रथम भोसलेने शोएब बागवानच्या पासवर गोल करीत संघास एक विरुद्ध शून्य गोलची आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘सुभाषनगर’कडून नितीन पोवार, प्रवीण सुतार, सुशील सावंत, आकाश मोरे, प्रकाश संकपाळ यांनी बरोबरी साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले; पण ‘दिलबहार’च्या भक्कम बचावफळीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. उलट ‘दिलबहार’कडून २० व्या मिनिटाला प्रतीक कांबळेने दिलेल्या पासवर अजिज मोमीनने गोल करीत संघाला दोन विरुद्ध शून्य गोलची आधाडी मिळवून दिली. या गोलनंतर दिलबहार संघाचे वर्चस्व राहिले.. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला अजिज मोमीनच्या पासवर प्लिंटो फ्रॅंकीने गोल करीत संघाचा तिसरा गोल फलकावर झळकवला.
उत्तरार्धात दिलबहार संघ आणखी चढाया करून मोठी आघाडी निर्माण करील असे प्रेक्षकांना वाटत होते. उलट नवख्या ‘सुभाषनगर’कडून ‘दिलबहार’च्या गोलक्षेत्रात वारंवार चढाया केल्या; पण खेळाडूंमध्ये योग्य समन्वय नसल्याने त्यांच्या गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या. अखेरपर्यंत सुभाषनगर संघाकडून आघाडी कमी करण्याचे प्रयत्न झाले; पण त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. परिणामी हा सामना ‘दिलबहार’ने तीन विरुद्ध शून्य गोलने जिंकला.
सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात यजमान बालगोपाल तालीम मंडळने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा तीन विरुद्ध एक गोलने पराभव केला. ‘बालगोपाल’कडून १३ व्या मिनिटाला प्रथमेश जाधवने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘प्रॅक्टिस’कडून साहील डाकवे, सूरज जाधव, ओम घाटगे, यश खोत, साईराज पाटील यांनी वेगवान चढाया केल्या; पण त्यांना यश आले नाही. उलट ३९ व्या मिनिटाला बालगोपालकडून सिंगटेकोमने गोल करीत संघाची आघाडी दोन विरुद्ध शून्य गोलने वाढविली.
उत्तरार्धात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने वेगवान चढाया करीत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यात ५६ व्या मिनिटाला यश आले. त्यांच्या आकाश बावकरने मिळालेल्या संधीवर गोल करीत सामन्यात दोन विरुद्ध एक गोलची आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर ‘बालगोपाल’कडून रोहित कुरणेने मिळालेल्या संधीवर ७३ व्या मिनिटाला गोल करीत संघाची आघाडी तीन विरुद्ध एक अशी भक्कम केली. ‘बालगोपाल’कडून सार्थक जाधव, सागर पोवार, लोयंगमबमा, आशिष कुरणे, आदित्य पाटील यांनी चढाया केल्या. अखेरपर्यंत हीच आघाडी कायम ठेवत सामना बालगोपाल संघाने जिंकला.
.................
आजचे सामने
स. ८. वा. ः पाटाकडील तालीम मंडळ ‘ब’ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस्
दु. ४. वा. ः संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध झुंजार क्लब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com