तिरंगा रॅली

तिरंगा रॅली
Published on

65973
वंदे मातरमच्या गजरात काँग्रेसची तिरंगा यात्रा
पहलगाम हल्ल्यातील शहिदांना आदरांजली; क्षेपणास्त्र, रणगाडे प्रतिकृतीचा चित्ररथ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘वंदे मातरम्‌, जय भवानी-जय शिवाजी, पाकिस्तान मुर्दाबाद'' अशा घोषणा देत काँग्रेस पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी आज शहरातील प्रमुख रस्त्यावर तिरंगा यात्रा काढली. पहलगाम हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी काँग्रेसतर्फे खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा झाली.
यात्रेच्या सुरुवातीला मोठा तिरंगा ध्वज, सुरुवातीला माजी सैनिक, त्या मागे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरीत्या यात्रा झाली. सीपीआर चौक, महापालिका, भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौकपर्यंत असा यात्रेचा मार्ग राहिला. कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांची पोस्टर, क्षेपणास्त्र तसेच रणगाडे असणारा चित्ररथही यात्रेत होता.
खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘देशासाठी सर्वजण एकत्रित आले आहेत. सैन्याने चांगले काम केले आहे. यात आपण कशी उत्तरे देण्याबाबत प्रश्‍न विचारणे चुकीचे नाही. विशेष अधिवेशन घेतले पाहिजे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून ही यात्रा सुरू झाली. सैन्याने केलेल्या जिगरबाज कारवाईला काँग्रेसचा पाठिंबा आहे. दहशतवाद मोडून काढण्यासाठी भारतीय सैन्यांकडून चांगली कामगिरी केली आहे. युद्ध नेमके कसे झाले. याची नेमकी माहिती देशासमोर आली पाहिजे. ही माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवले पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीळ विषय दुसरीकडे नेण्याऐवजी मूळ मुद्द्यांकडे आले पाहिजे.
आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजू आवळे, राहुल पाटील, सचिन चव्हाण, राहुल देसाई, शशांक बावचकर, राजेश लाटकर, बाबासो चौगले, शशिकांत पाटील - चुयेकर, बयाजी शेळके, राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफीक मुल्लाणी, गोपाळराव पाटील, विद्याधर गुरबे, माजी सैनिक, एन. एन. पाटील, रघुनाथ पाटील, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील उपस्थित होते.

इंदिरा गांधी यांची भूमिका :
पाकिस्तान विरोधात भारताची कोणती भूमिका असावी, हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दाखवून दिले होते. त्याच इतिहासाच्या पोस्ट सोशल मीडियावरून पाहिला मिळत होत्या. ज्याप्रमाणे इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला नमवले होते, तिच भूमिका आताही घ्यायला पाहिजे होती. अशी देशातील नागरिकांची मागणी होती, असेही आमदार श्री. पाटील यांनी नमूद केले.

‘क्रेडिट’ भारतीय सैन्याला
भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांशी लढा दिला. त्यामुळे याचे सर्व क्रेडिट कोणाला जात असेल, तर ते भारतीय सैन्यालाच दिले पाहिजे. जर कोण म्हणत असेल आमच्यामुळे ही जंग जिंकली, तर त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन याची विस्तृत माहिती देशाला द्यावी, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com