

सहायक आयुक्तांच्या ३११ जागा भरणार
पशुसंवर्धन विभाग होणार सक्षम ः कोल्हापुरात ७० पशुधन विकास अधिकारी भरती
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २७९५ पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कडून प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २० जूनपर्यंत पात्र इच्छुक अर्ज करता येणार आहेत. कोल्हापुरात ७० पशुधन विकास अधिकारी तर १८ सहायक आयुक्त यांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यात अडचणी येत आहेत. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट ‘अ’ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील २ हजार ७९५ पदे भरण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर केले. त्या पाठोपाठ प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेही मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा केला. महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने पशुसंवर्धन सहायक आयुक्त या संवर्गातील ३११ पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी २० जूनपर्यंत अर्ज मागविले आहेत.
ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातील पशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
--
तालुक्यात दोन ते तीन पदे भरणार
कोल्हापूर जवळपास साडेआठ लाख दुभती जनावरे आहेत. त्यासाठी १७८ शासकीय पशुवैद्यक दवाखाने आहेत. ११० पशुधन विकास अधिकारी आहेत. या जनावरांचे लसीकरण नियमित उपचार तसेच शस्त्रक्रिया भेटी सर्वेक्षण अशा कामासाठी पशुसंवर्धनकडे अपुरे मनुष्यबळ होते. यात पाच वर्षांत दुभत्या जनावरांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अशा स्थितीत शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी प्रलंबित होती. नव्या निर्णयानुसार पशुसंवर्धनला पशुधन विकास अधिकाऱ्यांची भरती होत आहे. यातील ७० पशुधन विकास अधिकारी कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्यात दोन तीन भरली जातील. त्यावर सहायक आयुक्त १८ भरले जातील. ते प्रत्येक तालुक्यासाठी नियुक्ती होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.